जि.प. शाळा आदर्श करण्यासाठी पुरणगाव पॅटर्न प्रेरणादायी प्रांताधिकारी गाढवे यांचे प्रतिपादनजि.प. शाळा आदर्श करण्यासाठी पुरणगाव पॅटर्न प्रेरणादायी
प्रांताधिकारी गाढवे यांचे प्रतिपादन

 आजी-माजी सैनिक, सेवानिवृत्त शिक्षक,देणगीदार यांचा रंगला सन्मान सोहळा

येवला  : पुढारी वृत्तसेवा

 माझी शाळा वाचवायची आणि वाढवायची, या शाळेतून गुणवंत विद्यार्थी घडवेत हा हेतू डोळ्यासमोर ठेवून माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या नवीन इमारतीसाठी शासकीय निधी सोबतच लोकसहभागाची संकल्पना मांडली, त्याला प्रतिसाद देत गावातील आजी-माजी सैनिकांनी भरीव असे योगदान देऊन एक लाख रुपये निधी जमा केला आणि तो आपल्या माता-पितांच्या हातून शाळा व्यवस्थापन समितीकडे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सुपूर्द केला,त्या अनुषंगाने शाळा व्यवस्थापन समितीने आजी-माजी सैनिकांचा,त्यांच्या माता पित्यांचा तसेच सेवानिवृत्त शिक्षकांचा आणि या इमारतीसाठी योगदान दिलेल्या सर्व देणगीदारांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात केला होता या प्रसंगी यांनी ग्रामस्थांचे या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाबद्दल कौतुक केले. मोठ्या प्रमाणात असलेला लोकसहभाग बघून ही शाळा जिल्ह्यात नक्कीच आदर्श शाळा होईल आणि हा पुरणगाव पॅटर्न म्हणून जिल्ह्यात उदयास येईल असा विश्वास व्यक्त केला. ग्रामस्थांनी उभे केलेले काम खूपच प्रेरणादायी आहे, आदर्श शाळा बनविण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
येवलाचे तहसीलदार महाजन साहेब यानी सैनिकांबद्दल कृतज्ञता म्हणून केलेल्या गौरव सोहळ्याचे कौतुक केले, मराठी शाळा वाचवायची आणि वाढवायची हा ग्रामस्थांचा संकल्प नक्की पूर्ण होईल असे सांगीतले, गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर साहेब यांनी शाळेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. युवा नेते सुनिल पैठणकर यांनी ग्रामस्थांचा आदर्श शाळा करण्याचा अभिनव उपक्रम ईतरांनीही प्रेरणा घेऊन राबवावा,भुजबळ साहेबांच्या माध्यमातून या शाळेला निधी कमी पडू दिला जाणार नाही असे सांगीतले, पंचायत समितीचे माजी सभापती प्रवीण गायकवाड यांनी मराठी शाळेतूनच विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती होते असे मनोगत व्यक्त केले,पत्रकार सुनील गायकवाड यांनी आजी-माजी सैनिकांनी दिलेले योगदान हे सदैव प्रेरणा देत राहील असे सांगितले. पुरणगावच्या माजी सरपंच विनोद ठोंबरे यांनी आपल्या मनोगतात संपूर्ण शाळा डिजिटल तसेच स्वच्छतेसाठी योगदान देण्याचे ठरविले.
आपल्या अध्यक्ष भाषणात जिल्हा परिषद कृषी आणि पशुसंवर्धन चे माजी सभापती संजय बनकर यांनी सांगितले की शासकीय निधी सोबतच एक अखंड शाळा व्हावी,सुंदर शाळा व्हावी हा हेतू डोळ्यासमोर ठेवून ग्रामस्थांनी घेतलेला निर्णय अतिशय स्तुत्य आहे आणि सैनिकांनी त्यासाठी दिलेले महत्त्वाचे योगदान हे इतरांना देखील सदैव प्रेरणा देत राहील, शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी आणि ग्रामस्थांनी एकत्रित प्रयत्न करावेत.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर ठोंबरे यांनी केले तर प्रास्ताविक महाजन सर यांनी केले तर प्रहार चे किरण चरमळ यांनी आभार मानले.

या प्रसंगी प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे,तहसीलदार आबा महाजन, पोलीस निरीक्षक शिंदे साहेब, गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर ,जि.प.चे माजी सभापती संजय बनकर, युवा नेते सुनिल पैठणकर, नितीन गायकवाड,माजी सभापती प्रवीण गायकवाड, केंद्रप्रमुख जालिंदर सोनवणे,भगवान ठोंबरे, पत्रकार सुनील गायकवाड, भाऊराव वाळके, सैनिक बाबासाहेब ठोंबरे, विनोद ठोंबरे शाळा व्यवस्थापन समितीचे चंद्रकांत गाढे, गणेश वरे,श्री महाजन सर,महाजन मॅडम,कराळे मॅडम, गांगुर्डे सर,गोरे मॅडम, शशिकांत ठोंबरे शिवनाथ ठोंबरे,निलेश ठोंबरे,विलास ठोंबरे,शिवाजी सोंदाणे, रायभान ठोंबरे रावसाहेब ठोंबरे,रामनाथ ठोंबरे, नानासाहेब ठोंबरे,साहेबराव ठोंबरे,रावबा ठोंबरे,चिंधूमामा वरे राजेंद्र ठोंबरे,नंदु झांबरे, ज्ञानदेव ठोंबरे ,नवनाथ काळे, सोसायटीचे नानासाहेब थेटे पोपा गणेश ठोंबरे, सरपंच कल्पना ठोंबरे,उपसरपंच श्रावण ठोंबरे,मंदाकिनी ठोंबरे, रामनाथ ठोंबरे,मच्छिंद्र ठोंबरे, उत्तम ठोंबरे,गणेश ठोंबरे,गोरख वरे,अशोक गाढे,संपत ठोंबरे,विकास ठोंबरे, माणिक ठोंबरे,नवनाथ ठोंबरे, 
जळगाव पैठणी हब मधील मेघश्याम ठोंबरे, प्रकाश शिंदे संतोष राजगुरू, साईनाथ गाढे, सोपान ठोंबरे, मधुकर ठोंबरे योगेश ठोंबरे,आण्णा गाढे,निरंजन ठोंबरे,बाळासाहेब ठोंबरे,दत्तू ठोंबरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 

फोटो : 

जिल्हा परिषदेच्या नवीन शाळेचे इमारतीसाठी एक लाख रुपये धनादेश सुपूर्द करताना आजी-माजी सैनिक,माता पिता आणि मान्यवर
थोडे नवीन जरा जुने