येवला विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष उतरणार...

महाराष्ट्रात हाेणा-या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष उतरणार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांची येवल्यात घेतलेल्या पञकार परिषदेत माहीती 

येवला : पुढारी वृत्तसेवा 

महाराष्ट्रात हाेणा-या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष उतरणार असुन पक्षाची ताकद असणाऱ्या शहरात पक्षाच्या वतीने उमेदवार निवडणूक लढणार असल्याची माहिती राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी येवला शहरात आयोजित करण्यात आलेल्या पञकार परिषदेत दिली शहरातील शासकिय विश्रामगृह येथे पञकार परीषदेचे आयाेजन करण्यात आले तेव्हा कटारे बाेलत हाेते. पञकारांशी वार्तालाप करताना कटारे म्हणाले की विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या काेर कमिटची बैठक घेण्यात आली असुन युती करण्यासाठी काही पक्षाच्या वतीने आम्हाला निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र समाधान कारक आमच्या पक्षाला जागा दिल्या तरच युती आघाडी करण्यात येईल अन्यथा नाही. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वतीने उमेदवार निवडणुक रिंगणात उतरविण्यात पक्षाच्या वरीष्ठ पदाधिकारी यांच्याशी निर्णय घेवुन पक्षाची रणनिती ठरविण्यात येणार आहे . येवला विधानसभा मतदार संघात पक्षाच्या वतीने निवडणुक लढविण्यासाठी चाचपणी करण्यात येत आहे. या संदर्भात पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. पुढिल महीन्यात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येवला शहरात भव्य मेळावा घेण्यात येणार आहे, असे स्पष्ट करून अण्णासाहेब कटारे पुढे बाेलताना म्हणाले कि मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्यातील मुक्तीभुमीचा विकास केला आहे आणि त्यामुळे मंत्री भुजबळ यांचा बद्दल आम्हाला आपुलकी आहे. परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात काय राजकिय घडामोडी घडणार आहे , आमची युती आघाडी काेणा बराेबर आहे यावर सर्व अवलंबून आहे.

 दरम्यान बदलापूर येथील घटनेवर बाेलताना कटारे म्हणाले की बदलापूर येथे घडलेली घटना प्रचंड चिड आणणारी आहे.  चिमुकलीवर एका नरधामाने अत्याचार केला या घटनेचा त्यांनी निषेध व्यक्त करून सदर घटनेतील आराेपीवर कडक कारवाई करण्यात यावी तसेच जलदगती न्यायालयात हा खटला चालविण्यात येवुन आराेपीली फाशी देण्यात यावी . महाराष्ट्रात सातत्याने महीला, मुलींवर अत्याचार सुरू आहे राज्यात महीला सुरक्षित नाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व प्रकाराला सरकार जबाबदार आहेत असा आराेप करून त्यांनी शासनाचा देखील निषेध केला  राज्यात अशा घटना सातत्याने घडत असुन काही घटना राजकिय दबावामुळे दाबल्या जात आहे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शासनाने प्रयत्न करणे आवश्यक असुन शासन जर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणार नसेल तर पक्षाच्या वतीने शासनाचा विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा अण्णासाहेब कटारे यांनी शेवटी बाेलताना दिला.  दरम्यान  कटारे यांच्या उपस्थितीत अनेक युवकांनी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला असुन सदर युवकांचा कटारे यांच्या हस्ते यथाेचित सत्कार करण्यात आला सदर  पञकार परीषदेला राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश युवा नेते बिपिन कटारे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष शांताराम थाेरे, येवला तालुकाध्यक्ष तुषार वाघ, प्रवक्ते सुभाष आंबेकर, युवा नेते सत्यवान वाघ, गणेश अहिरे, मनाेहर बनसाेडे, संदिप गायकवाड, प्रशांत कटारे, गिताराम घाेडेराव, आदीसह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते माेठ्या संख्येने उपस्थित होते आभार बिपीन कटारे, तुषार वाघ यांनी मानले .
फाेटाे/-
येवला शहरात आयोजित पञकार परिषदेत बाेलताना राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे, समवेत पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी 
 
थोडे नवीन जरा जुने