नांदेसर येथे नेत्र तपासणी शिबीर
---
येवला : प्रतिनिधी
नांदेसर ता.येवला येथे गावातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच सुभाष वाघ यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. येथील ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या या शिबिरात ८६ ग्रामस्थांनी डोळ्यांची तपासणी करत लाभ घेतला.
दिवसेंदिवस वाढत चाललेले डोळ्यांचे विकार व उतरत्या वयात डोळ्यांच्या समस्यांनी होणारे हाल यामुळे गावातील वृद्ध तसेच नागरिकांसाठी येवला येथील निरगुडे हॉस्पिटलचे नेत्रचिकित्सक डॉ. अविदत्त निरगुडे यांनी येथील रुग्णांची अद्यावत मशिनद्वारे मोफत तपासणी करत मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच सुभाष वाघ, उपसरपंच विमल कोकाटे, ग्रामपंचायत सदस्य विजय वाघ, मच्छिन्द्र वाघ, शिवाजी वाघ, रज्जाकभाई शेख, शिवाजी बेंडके, भाऊलाल बेंडके, प्रशांत कहार, ज्ञानेश्वर सोनवणे, सुनील कोकाटे, अमोल बेंडके आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
----