ईद ए मिलाद च्या निमित्ताने वाली बाबा मैदानात नेत्ररोग तपासणी आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर


ईद ए मिलाद च्या निमित्ताने वाली बाबा मैदानात नेत्ररोग तपासणी आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर

येवला . प्रतिनिधी

सामाजिक विकास बहूउद्देशीय सेवाभावी संस्था नेहरू युवा केंद्र नाशिक युवा कार्यक्रम क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने कौमीं एकता सप्ताह अंतर्गत ईद ए मिलाद च्या निमित्ताने वाली बाबा मैदानात नेत्ररोग तपासणी आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते त्या पसंगी 175 लोकांची तपासणी करून चष्मे देण्यात आले तसेच 35 रुग्णाचे मोतीबिंदू साठी नोंदणी करण्यात आली सदर रुग्णांना शासकीय योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार केले जाणार आहे 70 बालकांना अ जीवनसत्वाचा डोस देण्यात आला व 45 बॅग रक्त संकलन करण्यात आले या प्रसंगी समता ब्लड बँक नाशिक तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानि नेहरू युवा केंद्र नाशिक चे जिल्हा युवा समनव्यक भगवान गवई तर उदघाटन शहर काझी रफीयोद्दीन जनाब यांच्या हस्ते करण्यात आले सूत्र संचालन संस्था अध्यक्ष अजहर शाह यांनी केले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक शाफिक शेख अमजद शेख पोलीस निरीक्षक नानासाहेब नागदरे पो . हवालदार चंद्रकांत निर्मळ आलमगीर शेठ अकबर शाह किशोर परदेशी डॉ. इरफान पठाण डॉ. पाटील मुकुंद आहिरे महिंद्र पगारे आदी उपस्थित होते मान्यवरांचा सत्कार भगवान गवई यांच्या हस्ते करण्यात आले तसेच मागील अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या सामाजिक उपक्रम च्या माध्यमातून जे समाज कार्य संस्थाअध्यक्ष करत आहे त्या बद्दल हाजी आलमगीर शेठ यांनी अजहर शाह यांचा सत्कार केला या प्रसंगी शहर काझी यांनी सदर उपक्रमा बद्दल संस्थेचे गौरव केला व शहरातील नागरिकांनी सदर शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आव्हान केले पोलीस निरीक्षक नानासाहेब नागदरे यांनी ईद च्या दिवशी असे सामजिक उपक्रम या शहरात सामाजिक संस्थेच्या माध्यमातून होतात आज युवक अश्या सामजिक उपक्रमात सहभागी होतात हे बघून खूप आनंद वाटले असे ही त्यांनी यावेळी सांगितले भगवान गवई यांनी कौमीं एकता सप्ताह आणि ईद ए मिलाद चे महत्व लोकांना सादर केले सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना गरजू लोकांना माहीत होतं आहे आणि संस्थेच्या प्रत्येक कामासाठी नेहमी नेहरू युवा केंद आपल्या सोबत आहे असे प्रतिपादन त्यांनी केले यावेळी शाकिर शेख शेरू मोमीन सलीम काझी शाफिक मोमीन शाफिक शेख बबलू शेख फहिम शेख वचन माळी आदी ही उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी अश्विनी जगदाळे आफरीन शेख इशरत खान सुलताना शेख बखतीयर शेख आदिंनी परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या शेवटी संस्था अध्यक्ष अजहर शाह यांनी सर्वांचे आभार मानले
थोडे नवीन जरा जुने