प्राथमिक शिक्षकांच्या प्रलबिंत मागण्या ,प्रश्न व समस्या तातडीने सोडवण्यासाठी येथील प्राथमिक शिक्षकांतर्फे धरणे आंदोलन करण्याचा इशारा देणेत आला आहे. आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांनी नुकतेच येवला पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी मुंढे यांना दिले आहे. सदर प्रसंगी बाजीराव सोनवणे, बाबासाहेब पवार , दिपक थोरात, नाना सोनवणे, नारायण डोखे, किरण जाधव इत्यादी उपस्थित होते.