येवला (अविनाश पाटील)
स्त्रीभ्रूण हत्या या विषयाकडे लक्ष वेधण्याबरोबर 'लेक वाचवा'चा जागर
करण्यासाठी श्री गुरुदेव दत्त सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित घोषवाक्य
स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यात पुष्पा सावंत यांनी
बाजी मारली.
महिला दिनानिमित्त महिला सबलीकरण, स्त्रीभ्रूण हत्या या विषयांवर ही
स्पर्धा घेण्यात आली होती. 'निसर्गाचा समतोल राखूया, स्त्रीजन्माचे
स्वागत करूया,' 'आज मुलींचा जीव घोटून, उद्या सून आणाल कोठून?,'
'घराघरांत नारा आहे, मुलगी आई-वडिलांचा सहारा आहे,' 'आज मुलगा-मुलगा करू
नका, उद्या मुली मिळत नाही म्हणून रडू नका,' 'मुलापेक्षा मुलगी बरी, दिवा
लावते दोन्ही घरी,' 'नारी का जो करे अपमान उसको समझो पशुसमान!' आदी
एकापेक्षा एक वरचढ घोषवाक्यांनी परीक्षकांची परीक्षा पाहिली, असे
व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांनी सांगितले. विजेत्या दहा स्पर्धकांना
ज्येष्ठ साहित्य समीक्षक प्रा. गो. तु. पाटील यांच्या हस्ते पारितोषिक
वितरण झाले. प्रथम क्रमांकाच्या मानकरी पुष्पा सावंत यांना संस्थेच्या
वतीने सेमी पैठणी देण्यात आली. विजेत्यांमध्ये जान्हवी लाड, माया
बुिद्धवंत, तुलशी वर्दे, वत्सला जाधव, आशा गिरासे, श्वेता पटेल, मानसी
कोष्टी, सिद्धी गुजराथी यांचा समावेश असून, त्यांना भेटवस्तूंनी
गौरविण्यात आले. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष भारत धुमाळ, संचालक
सिद्धार्थ पारख, बाळासाहेब झळके, प्रकाश साबरे, अशोक काळे, राजेंद्र
बांगर, प्रवीण धुमाळ, काशीनाथ धुमाळ, रवींद्र करमासे उपस्थित होते.