नागरी हिताच्या कामाला प्राधान्य देवून कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना मजबूत करावी - आ.जयंत जाधव

नाशिक शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नुतन कार्यकारिणीची पहिली बैठक भुजबळ फार्म येथे संपन्न झाली. यावेळी आ.जयंत जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी छायाचित्रात शहराध्यक्ष शरद कोशिरे आणि प्रदेश चिटणीस नाना महाले,  महिला शहराध्यक्षा सुनिता निमसे, युवक शहराध्यक्ष छबू नागरे


नाशिकः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नुकतीच जाहीर केलेली नूतन कार्यकारिणी सर्वसमावेशक असून अनेक कार्यकर्त्यांनी नागरी हिताची कामे करून प्रसंगी वेगवेगळी आंदोलने करून पक्षसंघटना मजबूत करावी असे आवाहन आ.जयंत जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नुतन शहर कार्यकारिणीला मार्गदर्शन करतांना केले.
 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शरद कोशिरे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या भुजबळ फार्म येथील कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहर कार्यकारिणीतील बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत माजी आरोग्यमंत्री दिग्वीजय खानविलकर, चित्रपट अभिनेता राजेश खन्ना, दिवंगत डॉ.वसंत पवार यांचे वडिल निवृत्ती आण्णा पवार,माजी आमदार दुलाजीनाना पाटील,  रेवजी पाटील-निमसे इत्यादींचे निधन झाल्यामुळे कार्यकारिणीने दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून सर्वांना श्र्रध्दांजली वाहिली. प्रदेश चिटणीस नानासाहेब महाले, महिला शहराध्यक्षा सुनिता निमसे, युवक शहराध्यक्ष छबू नागरे आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 26 सप्टेंबर रोजी नाशिक मध्ये होणाया जिल्हास्तरीय युवती मेळाव्यासाठी शहरातील जास्तीत जास्त युवतींची नोंदणी करून त्या उपस्थित राहतील याची आखणी प्रभागस्तरावरून करण्याचे आवाहन यावेळी शहराध्यक्ष कोशिरे यांनी उपस्थित पदाधिकार्यांना केले.
 कार्यकर्त्यांनी कामाचे वार्षिक वेळापत्रक तयार करून लोकोपयोगी कामे करावीत त्यातून नागरिकांमध्ये आपले स्थान निर्माण करावे असे आ.जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले. नानासाहेब महाले यांनी विरोधकांवर टिका करतांना सांगितले की, सध्याचे महापालिकेतील सत्ताधारी खोटी स्वप्ने दाखवून निवडून आले आहेत. आज शहरात नागरी समस्यांचा डोंगर उभा आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. घंटा गाडया वेळेवर येत नाहीत, या मुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. या खड्यात राष्ट्रवादीने वृक्षारोपण करून नागरिकांच्या भावना सत्ताधार्यांपर्यंत पोह्चवल्या आहेत. महापालिकेशी सबंधित नागरी हिताच्या निर्माण होणाऱ्या  समस्यांची जाणीव नागरिकांना करून दयावी असे आवाहन त्यांनी केले.
     आगामी निवडणूका लक्षात घेता ‘मिशन – 2014’ डोळयासमोर ठेवून नूतन कार्यकारिणीतील पदाधिकायांनी पदे अडकवून न ठेवता जनतेच्या हिताची कामे करून पक्षवाढीसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन शहराध्यक्ष शरद कोशिरे यांनी केले. ते म्हणाले, येत्या वर्षभरात 50 हजार झाडे लावण्याचा उपक्रम राबवायचा आहे,  राष्ट्रवादी युवती विभागासाठी प्रत्येक ब्लॉक अध्यक्षांनी 300 तर नगरसेवकांनी 100 युवतींची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आल्याचे ते म्हणाले. शहर जिल्हयात पालकमंत्री छगन भुजबळ आणि खासदार समीर भुजबळ यांच्या प्रयत्नातून राज्य आणि केंद्र शासनाच्या निधीतून सुरू असलेल्या विकासाच्या घौडदौडीमुळे ‘मिशन–2014’ मध्ये  नाशिक शहरातून राष्ट्रवादीचे दोन आमदार आणि खासदार निश्चितपणे  निवडून येतील असा विश्वास शहराध्यक्ष शरद कोशिरे यांनी व्यक्त केला.
     यावेळी नूतन शहर चिटणीस बाळासाहेब सोनवणे  यांनी नविन सिडको मधील पेलिकन पार्क हा गुन्हेगाराचा अड्डा झाला असून या ठिकाणामुळे परिसरात आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत असल्याचे सांगून या विषयी पक्षाने आवाज उठवून सिडकोवासियांना दिलासा देण्याचे आवाहन केले. संघटनेचे कामकाज यापुढे कागदोपत्री न होता प्रत्यक्ष जनमानसांत होर्इल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी उपाध्यक्ष रामू जाधव यांनी शहरातील कामगारांच्या प्रश्नावर पक्षा मार्फत भरीव कार्य करण्याची गरज व्यक्त केली. महिला शहराध्यक्षा सुनिता निमसे, युवक शहराध्यक्ष छबू नागरे यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
     गुटखा बंदी अंमलात आणल्यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, नुतन प्रदेश कार्यकारिणीतील सर्व सदस्यांचे तसेच नाशिकमधील पदाधिकारी आ.हेमंत टकले, नाना महाले, तुकाराम दिघोळे, शिवराम झोले , सुरेश दलोड यांचे अभिनंदन करण्यात आले. आ.जयंत जाधव यांची विधान परिषदेवर फेरनिवड झाल्यामुळे त्यांच्याही अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.
थोडे नवीन जरा जुने