हक्काच्या घरासाठी आज येवल्यात उपोषण

येवला ( प्रतिनिधी ) - इंदिरा आवास योजनेतून घरकुल मिळण्यास पात्र असून
ही ग्रामसेवक, गटविकास अधिकारी यांनी संगनमत करून आपल्याला घरकूल मिळून
नये असा कट केला असा आरोप करत पाटोदा येथील भूमिहिन मजूर कैलास बबन इघे,
बबन दगडू इघे, गणेश बळीराम बैरागी, सिंधूबाई बळीराम बैरागी यांनी आता
आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. आज पासून ते येवला तहशिल कार्यालय
आवारात उपोषणास बसत आहेत. सदर लाभापासून वंचित ठेवण्यासाठी पाटोदा
ग्रामपंचायतीने ही ह्या शेतमजुरांवर अन्याय केला आहे. इघे आणि बैरागी
कुटुंब ४० वर्षांपासून गावाचे रहिवासी असून सध्या हे मजुर पाटोदा येथे
रस्त्याच्या कडे ला झोपडी बांधून दयनीय अवस्थेत राहत आहेत. सध्याच्या
राहत्या जागेवर आपल्याला घरकूल बांधून मिळावे अशी त्यांची मागणी आहे.
गावात अनेक अपात्र असताना लोकांनी घरकूल योजनेचे लाभ मिळाले असून खर्‍या
गरजवंताना शासनाने यापासून या योजने पासून दूर ठेवून आपल्यावर अन्याय
केला आहे. अन्याय दूर होई उपोषण मागे घेतले जाणार नाही. आम आदमी पार्टीने
या उपोषणास जाहीर पाठींबा दिला आहे.
"आम आदमी पक्ष आपल्या पातळीवरून सदर प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार
आहे. केवळ इघे आणि बैरागी कुटुंबीयच नव्हे तर तालुक्यात ज्या ज्या पात्र
लाभार्थांना शासकीय योजना मधून अपात्र ठरविण्यात आले आहे त्यांच्या
पाठीशी आम आदमी पक्ष ठामपणे उभा राहील...- भागवत सोनवणे, संयोजक , येवला
विधानसभा, आम आदमी पार्टी .
थोडे नवीन जरा जुने