“आर्य निकेतन स्कूलचा पक्षांसाठी पक्षी मित्र अभिनव उपक्रम”

 
"आर्य निकेतन स्कूलचा पक्षांसाठी पक्षी मित्र अभिनव उपक्रम"

येवला - वार्ताहर
          पाखरांसाठी आर्य निकेतन शाळेतील चिमुल्यानी टाकाऊ वस्तूंपासून पाखरांना चारा-पाण्याची सोय करण्याचा संकल्प केला आहे. शाळा निसर्गरम्य वातावरणात शहराजवळील पारेगाव येथे आहे.शालेय परिसरात २०० ते २५० छोटे मोठे वृक्ष लागवड केलेली आहे.या परिसरात नेहमी पक्षांची किलबिलाट असते,अनेक प्रकारचे पक्षी येथे असतात. शाळेतील शिक्षकांनीं व मुलांनी प्लास्टिकचा कचरा करणाऱ्या बाटल्या, डबे,बरण्या यापासून विविध आकाराच्या पाण्याच्या व चारादाण्याची भांडी स्वतः तयार केली, यासाठी कुठलाही खर्च केलेला नाही झिरो बजेट मधून पक्षांचे अस्तीत्व टिकावे, सृष्टी सुंदर रहावी यासाठी शाळेतील ३५० विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एक याप्रमाणे चारा व पाणी यासाठी भांडी स्वतः तयार केली व शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या १५ ते २० गावांमध्ये चिमण्यांच्या चारापाण्यासाठी घरावरती भांडे लावली जाणार आहेत.प्रथम सुरुवात शाळेच्या परिसरातील झाडावरती लावली गेली.
          या उपक्रमातून विध्यार्थ्यांमंध्ये दुसऱ्यासाठी काही करण्याची भावना जागृत व्हावी , सृष्टीचे संवर्धन होण्यासाठी हातभार लागावा हाच उद्देश शाळेतील शिक्षकांनी ठेवून विध्यार्थ्यांना त्यांचे महत्व  सांगितले त्यासाठी शाळेच्या शिक्षकवृंदाने सहभाग घेऊन व मार्गदर्शनाने उपक्रम पूर्ण केला.
        या उपक्रमाचे पालक व परिसरातील नागरिक यांनी शाळेतील विध्यार्थी, शिक्षक यांचे कौतुक केले. या संस्थेचे अध्यक्ष श्री खुशाल गायकवाड यांनी 'पक्षी संवर्धन' या उपक्रमावर बोलताना  शिक्षक,विध्यार्थी यांचा 'पक्षी मित्र' म्हणून गौरव केला.तसेच या उपक्रमातून हजारो पक्षांना जीवदान मिळेल असा उपक्रम रबीविणारी "आर्य निकेतन स्कूल" हि एक उपक्रमशील शाळा असल्याचा उल्लेख त्यांनी केला.


थोडे नवीन जरा जुने