लोकन्यायालयाच्या माध्यमातून १७०० च्या वर प्रकरणे निकाली… विविध दावे व वादपुर्व प्रकरणातून सुमारे ४७ लाख रुपयांच्या वर वसूली

 


लोकन्यायालयाच्या माध्यमातून १७०० च्या वर प्रकरणे निकाली…

विविध दावे व वादपुर्व प्रकरणातून सुमारे ४७ लाख रुपयांच्या वर वसूली

येवला – प्रतिनिधी

तालुका विधी सेवा समिती व येवला वकिल संघाच्या वतीने आयोजित लोक न्यायालयाच्या माध्यमातून १७०० च्यावर दावे व प्रकरणे सामंज्यस्याने मिटवली गेली. विविध दावे व वादपुर्व प्रकरणातून सुमारे ४७ लाख रुपयांच्या वर वसूलीही लोकन्यायालयाच्या निमित्ताने झाली आहे. लोकन्यायालयाच्या माध्यमातून ही प्रकरणे सांमज्यसाने मिटवली गेल्यामुळे वादी व प्रतिवादी यांना न्याय मिळाल्याची भावना होत होती.  

शनिवारी सकाळी येथील न्यायालयामध्ये लोकन्यायालयाला न्या. एस.एन.शिंदे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली. शनिवारी दिवसभर चाललेल्या या लोकन्यायालयामध्ये तालुक्याच्या न्यायक्षेत्रातील ग्रामपंचायती, नगरपालिका, विविध बँकाचे एकुण ५४३१ वादपुर्व  प्रकरणापैकी १६९६ प्रकरणांमध्ये परस्पर सांमज्यसांने तोडगा काढला गेला. या वादपुर्व प्रकरणांतून ३०,४३,७५१/- रुपयांची वसूली झाली. न्यायालयातील इतर १९८ प्रकरणातून ४९ प्रकरणे निकाली निघाली. यामध्ये १७,३०,१७८/- रुपयांची वसूली करण्यात आली. न्यायालयातील २८ दिवाणी प्रकरणापैकी ३ निकाली काढण्यात आले तर एक दिवाणी दरखास्तही यात निकाली निघाली.

लोकन्यायालय यशस्वी होणेसाठी  न्या. एस.एन.शिंदे , न्या, एन.एन.चिंतामणी , येवला वकिल संघाचे अध्यक्ष एड.प्रकाशराव गायकवाड यांचेसह सदस्य वकील, येवला शहर पोलिस ठाण्याचे निरिक्षक संजय पाटील , गटविकास अधिकारी सुनिल अहिरे व सर्व ग्रामसेवक , येवला नगरपालिकेच उपमुख्याधिकारी शेख यांचेसह नगरपालिका कर्मचारी, येवला न्यायालयातील अधिकारी व कर्मचारी  प्रयत्नशिल होते.



थोडे नवीन जरा जुने