पावसासाठी ५१ तासाचे उपोषण ....

 

पावसासाठी ५१ तासाचे उपोषण ....

येवला . = प्रतिनिधी
तालुक्यातील नांदेसर येथे सरपंच सुभाष भाऊ वाघ यांनी वरून राजा ला प्रसन्न करण्यासाठी 51 तास चे साकडे घातले होते त्यासाठी रविवारी येवला पंचायत समिती चे उपसभापती रुपचंद  भागवत यांनी त्यांना लिबू पाणी व पेढा भरवून साकडे वजा उपोषण  सोडण्यात आले,   नांदेसर येथील ग्रामस्थ,  सरपंच यांनी पाऊस पडावा म्हणुन हनुमंतरायाला साकडं घालण्यासाठी 51तासाचे उपोषणाचा संकल्प केला. पावसाळा सुरू   तिन महिने संपत आले. तालुक्यात अत्यल्प पर्ज्यन्यमान झालेले आहे. थोड्या पावसावर पेरण्या झालेल्या आहे. पिके उगलेली आहे. परंतु पुरेशा पाऊस नसल्याकरनाने पिके वाळून चालली आहे. जनावरांना चारा नाही, पिण्यासाठी पाणी नाही. दुष्काळ सद्रुष्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे भरपूर पाऊस पडावा म्हणुन नांदेसर येथील सरपंच, सदस्य, ग्रामस्थ, महिला  51तासाचे उपोषणाचा संकल्प करून हनुमान मंदिरात उपोषणास बसले होते. आज दि 12/08/2018 रोजी सकाळी 9 वाजता संकल्प पूर्ती झाली. सदर संकल्प पूर्ती प.स.येवलाचे शिवसेना उपसभापती श्री रूपचंद भागवत यांचे हस्ते लिंबू पाणी घेऊन पुर्ण करण्यात आले. तसेच नांदेसर येथील अर्चना मोरे यांचे पती मंगेश आहेर हे 3 वर्षापूर्वी मयत झाले. त्यांना 4 मुली आहे. राहण्यासाठी घर नाही. पंचायतकडे सर्व प्रयत्न करून झाले.परंतु घरकुल मंजूर होईना.ही बाब गांवचे सरपंच दत्तु वाघ,  पोलिस पटिल सुनील वाघ, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांनी उपसभापती रूपचंद भागवत यांचे लक्षात आणुन दिली. रूपचंद भागवत यांची गरजु, गरीब, पीडितांसाठी काम करणारी नारायणगिरी महाराज फाउंडेशन नाशिक ह्या संस्थेच्या वतीने घरखोली बांधून देऊ असे आश्वासन शिवसेना उपसभापती रूपचंद भागवत यानी दिले. उपोषण साठी सहभागी झालेले गावातील मोठ्या संख्येने महिला व पुरुष सहभागी झाले होते व दिवस रात्र हनुमान मंदिरात 51 तास बसून होते त्यात सरपंच सुभाष वाघ उपसरपंच विजय वाघ सर्व ग्रा प सदस्य तसेच कुसुम बाई सोनवणे पुष्पा वाबळे विमल बाई कोकाटे उजवला वाघ  संगीता वाघ किसनाबाई जाधव मुक्ताबाई वाघ आशबाई वाघ सुभद्रा बाई मोरे व दिलीप मोरे भीमराज कोकाटे चांगदेव सदगीर मचिंद्र वाघ गोरख वाघ सुदाम बेंडके काशीनाथ मिटके तुळशीराम सदगीर रमेश वाघ वाल्मिक जाधव रघुनाथ जाधव कचरू वाघ श्यामद भाई शेख रशीद भाई शेख गुलाब भाइ मुनिर भाई लतीफ बजाय शेख चांद भाई  दत्तू जादव शाबीर शेख चांगदेव बेंडकेव इतर लोक सहभागी होते. यावेळी प्रा.विलास भागवत सर, ज्ञानेश्वर भागवत,  जानराव सर,  उशीर मान्यवर उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने