गुणगौरव,कलागुणांच्या सादरीकरनासह जगदंबा शिक्षण संस्थेत देखणी सलामीगुणगौरव,कलागुणांच्या सादरीकरनासह जगदंबा शिक्षण संस्थेत देखणी सलामी

 


येवला : प्रतिनिधी

देखणी सलामी,लेझीम पथक,सुंदर गायन तसेच विविध कलागुणांचे सादरीकरण करून जगदंबा शिक्षण संस्थेच्या बाभूळगाव येथील संतोष श्रमिक माध्यमिक विद्यालय व ज्यू. कॉलेजमध्ये विधार्थ्यानी स्वातंत्र दिवस साजरा केला.

जगदंबा व मातोश्री शिक्षण संस्थेच्या या कार्यक्रमाला मातोश्री आसराबाई आयुर्वेद,एस.एन.डी.अभियांत्रिकी, एम.बी.ए, तंत्रनिकेतन,फार्मशी,नर्शिंग, कृषी,तंत्रनिकेतन, डी.एड.,बी.एड.,आयटीआय या सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य,प्राध्यापक व विध्यार्थी उपस्थित जोते. संकुलाच्या प्रशस्त आवारात संस्थेचे सेक्रेटरी लक्ष्मन दराडे व सेवानिवृत्त कृषी अधिकारी नागरे यांच्या हस्ते सरस्वती पूजन व ध्वजपूजन करण्यात येऊन ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी सेवानिवृत्त जवान भगवान रोकडे यांनी विधार्थ्यासह देखणी सलामी देत ध्वजाला मानवंदना दिली.मुलींच्या आकर्षक लेझीम पथकाने  उपस्थितांचे लक्ष वेधले.तर मंजुळ आवाजात देशभक्तीपर गीत गायन करून शुभम पवार याने टाळ्या मिळवल्या.

यावेळी दहावी,बारावीतील गुणवंतांचा गौरव दराडे व नागरे यांच्या हस्ते करण्यात आला. प्राचार्य गोरख येवले,सुनील पवार,प्रसाद गुब्बी,आयुर्वेद महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.मिनेश चव्हाण,एसएनडी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरी कुदळ,तंत्रनिकेतनचे प्राचार्य अनंत जोशी,फार्मशी महाविद्यालयाचे प्राचार्य रमेश कोलकोटवार,वंदना संचेती,जयप्रकाश कोकणे,पवन आव्हाड,कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राचार्य डॉ.दिनेश कुळधर,रमेश कदम,बी.एड.चे प्राचार्य भागवत भड, डी.के.मोरे, संदीप आहिरे,तुषार भागवत,विद्यालयाचे उपप्राचार्य अप्पासाहेब कदम आदी उपस्थित होती.प्रा.संतोष विंचू,प्रदीप पाटील,दत्ता खोकले यांनी सूत्रसंचालन केले.प्राचार्य गोरख येवले यांनी आभार मानले.

फोटो

बाभूळगाव : संतोष विद्यालय व ज्यू.कॉलेजमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला केलेली देखणी आसनव्यवस्था 


 
 

थोडे नवीन जरा जुने