सायगाव व पाटोदा पशुवैद्यकीय इमारत बांधकामाचा २०१८ -१९ च्या आराखडयात समावेश मंत्री महादेव जानकर यांची छगन भुजबळ यांना पत्राद्वारे माहितीसायगाव व पाटोदा पशुवैद्यकीय इमारत बांधकामाचा

२०१८ -१९ च्या आराखडयात समावेश

मंत्री महादेव जानकर यांची छगन भुजबळ यांना पत्राद्वारे माहिती

 येवला :- प्रतिनिधी

येवला तालुक्यातील सायगाव व पाटोदा या पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या इमारती अतिशय जीर्ण व निकामी झाल्यामुळे या ठिकाणी नवीन इमारतींचे बांधकाम करण्याची छगन भुजबळ यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कपात सुचनेद्वारे मागणी केलेली होती. सदर इमारतींच्या बांधकामाचा २०१८ -१९ च्या आराखड्यात समावेश करण्यात आला असून यासाठी २ कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी करण्यात आली असल्याची माहिती छगन भुजबळ यांना  पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य विभाग मंत्री महादेव जानकर यांनी दिली आहे.

येवला मतदार संघातील सायगाव व पाटोदा (ता. येवला) या पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या इमारती अतिशय जीर्ण व निकामी झाल्यामुळे या जुन्या इमारती निर्लेखन करून या ठिकाणी नवीन इमारती बांधण्यात याव्या अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आ.छगन भुजबळ यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कापात सुचनेद्वारे केली होती. तसेच यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा देखील सुरु होता. त्यानंतर राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य विभाग मंत्री महादेव जानकर यांनी सदर इमारतींचा बांधकाम करण्यासाठी प्राधान्याने २०१८- १९ च्या आराखड्यात समावेश करण्यात आला असल्याची माहिती दिली आहे

महादेव जानकर यांनी छगन भुजबळ यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सायगाव व पाटोदा (ता. येवला) या दोन्ही पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या निर्लेखानाचा प्रस्तावास यापूर्वी दि.२९ जून २०१६ रोजीच्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेमध्ये ठराव क्र.८५४ व ८५५ अन्वये मंजुरी प्राप्त करून घेण्यात आलेली आहे. निधी अभावी सदर दवाखाना इमारत बांधकामास सन २०१७-१८ वर्षात मान्यता देण्यात आलेली नाही. तथापि सन २०१८-१९ साठी सादर करावयाच्या प्रारूप आराखडयात एकूण २ कोटी एवढ्या रकमेची मागणी करण्यात आलेली आहे. तसेच कृती आराखड्यात द्यावयाच्या कामांमध्ये या दोन्ही इमारतींचे बांधकाम या कामचा प्राधान्याने समावेश करण्यात आलेला असल्याची माहिती मंत्री महादेव जानकर यांनी छगन भुजबळ यांना दिलेली आहे.


थोडे नवीन जरा जुने