महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची कार्यकारणी जाहिर

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची कार्यकारणी जाहिर

 येवला : प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची बैठक नाशिक येथील राजगड कार्यालयात संपन्न झाली. विद्यार्थी सेनेचे प्रदेश अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची कार्यकारणी जाहिर केली. जिल्हा उपाध्यक्षपदी महेश लासुरे, चिटनीसपदी सागर खोडके, येवला तालुकाध्यक्षपदी राहुल जाधव, शहराध्यक्षपदी महेंद्र जाधव, सरचिटणीसपदी लखन पाटोळे, तालुका उपाध्यक्षपदी सागर पवार, तालुका संघटक पदी गणेश चव्हाण यांची नियुक्ती केली. या निवडीचे मनसे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. राजेश पटेल, जिल्हा सरचिटणीस रामदास लासुरे, तालुका अध्यक्ष नकुल घागरे, शहराध्यक्ष गौरव कांबळे यांनी अभिनंदन केले. 
थोडे नवीन जरा जुने