भुजबळांनी मर्यादा ओलांडल्या


भुजबळ यांनी बाळासाहेबांची टिंगल केली...

येवला :  


भुजबळांनी  बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संघर्ष केला व दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला,  बाळासाहेबांची टिंगलटवाळी केली आणि आमच्याकडे मला संरक्षण द्या अशी मागणी केली आम्ही त्यांना नागपूरला हलवलं पोलीस संरक्षण दिले. भुजबळ विधानसभेत पडल्यावर त्यांना विधानपरिषदेत घेतलं विरोधी पक्षनेते केले, मंत्रीपद दिले त्यांना त्यांच्यात काही कारणामुळे पद सोडावे लागले त्यानंतर माझ्या शब्दाखातर तुम्ही येवले करांनी निवडून दिले उपमुख्यमंत्री केल नंतर चौकशा झाल्या जेलमध्ये गेले तरीही आम्ही मदत केली ठाकरे सरकार मध्ये मंत्री केल, तरीही त्यांनी  धोका दिला पक्ष फोडला.
अजितदादांची समजूत काढायला जातो म्हणून गेले आणि परत आलेच नाही  , फसवेगिरीच्या सगळ्या मर्यादा त्यांनी ओलांडल्या त्या शिल्लक ठेवल्या नाही असा घनाघाती आरोप राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी येवला येथे जाहीर सभेत केला . अशी व्यक्ती आज उमेदवार आहे त्यांना यावेळी पराभव पहावा लागेल असे वक्तव्य  पवार यांनी  केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार एडवोकेट माणिकराव शिंदे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते . यावेळी ते म्हणाले की आपण सगळे माणिकराव शिंदे यांचे बरोबर आहेत याचा आनंद आहे . शिंदे यांना विजयी करा ही निवडणूक जनतेने हाती घेतली आहे आपण इतिहास निर्माण करावा मी कोणत्याही वेळी तुमच्या मागे उभा राहील हा शब्द देतो आपण आपला आशीर्वाद द्यावा ही लढाई आम्ही जिंकू असेही ते यावेळेस म्हणाले. 

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामधील मैदानामध्ये ही सभा पार पडली. यावेळी ढोलताशांच्या गजरात शरद पवार यांचे स्वागत करण्यात आले . सभेचे मैदान खचाखच भरले होते , बसायला जागा नसल्याने लोक पाण्याच्या टाकीवर बसून सभा पहात होते महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने