येवला तालुका माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर सेवकांची सहकारी पतसंस्थेची २२वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न




येवला तालुका माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर सेवकांची सहकारी पतसंस्थेची २२वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
 
८ टक्के लाभांश जाहीर

येवला : प्रतिनिधी
 
येवला तालुका माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर सेवकांची सहकारी पतसंस्था मर्या. येवला या संस्थेची २२वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज रविवार दि. १६/९/२०१८ रोजी खेळीमेळीच्या वातावरणात पतसंस्थेचे चेअरमन श्री. अरविंद जोरी यांच्या अध्यक्षतेखाली स्वामी मुक्तानंद विद्यालय येवला येथे संपन्न झाली. *सदर सभेत लाभांश ८ टक्के जाहीर करण्यात आला. कर्ज व्याज दर ८.५ टक्के करण्यात आजच्या सभेने सर्वानुमते मंजुरी दिली.* 
प्रारंभी संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री. साहेबराव घुगे यांनी सभासदांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. सेवानिवृत्त शिक्षक सभासदांच्या हस्ते सरस्वती पूजन व दिपप्रज्वलन करून सभेस सुरुवात करण्यात आली. प्रारंभी अहवाल सालात जे सभासद व भारतीय थोर नेते, देशातील शहीद जवान, आंबेनळी घाटातील बस अपघात व केरळ महापुरातील मरण पावलेले व्यक्ती यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 
त्यानंतर श्री.प्रमोददादा पाटील, श्री.ज्ञानेश्वर शिंदे, श्री.नंदकिशोर गायकवाड, श्री.नारायण बारे, श्री.सतिष भावसार, श्री.विजय अहिरराव या संस्थेच्या सेवानिवृत्त झालेल्या सभासदांचा यथोचित सत्कार करण्यात आला. 
त्यानंतर अहवाल सालातील प्रगतीचा आढावा सांगून अहवाल पत्रिकेतील विविध विषयांचे वाचन संस्थेचे कार्यवाह श्री. प्रदीप पाटील यांनी केले. विषयपत्रिकेतील विषय सर्वानुमते मंजुरी देत त्यात *लाभांश ८ टक्के* देण्याचे ठरले. तसेच ऐनवेळीच्या विषयात सभासदांच्या मागणीनुसार *कर्ज व्याज दर ८.५ टक्के* करण्यात आला. यावेळी चर्चेमध्ये मुख्याध्यापक श्री.दिनकर दाणे, मुख्याध्यापक श्री.विजय चव्हाण, मुख्याध्यापक श्री.आप्पासाहेब जमधडे, मुख्याध्यापक श्री.रामदास भड, मुख्याध्यापक श्री.चांगदेव कुळधर, मुख्याध्यापक श्री.अरुण पैठणकर, श्री.सुनील मेहेत्रे, श्री.राजेंद्र जाधव, श्री.नवनाथ उंडे, श्री.रखमाजी भड, श्री.तुकाराम लहरे, श्री.सुरेश जोरी, श्री.सुरेश मोहिते, श्री.अनिल भागवत, श्री.विजय आरणे, श्री.अंबादास मगर आदींनी सभेत सूचना मांडल्या. प्राचार्य श्री.जी.एस. येवले यांनी संस्थेच्या पारदर्शक कारभाराबद्दल आपल्या मनोगतातून समाधान व्यक्त केले. 
अध्यक्षीय मनोगतात श्री.अरविंद जोरी यांनी, सर्व सभासदांच्या सहकार्याने संस्थेची वाटचाल यशस्वीरीत्या सुरु असून यापुढेही सातत्याने विश्वासपूर्ण वाटचाल सुरूच राहील अशी ग्वाही दिली. संस्थेचे संचालक श्री.साहेबराव गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले. सभा यशस्वीतेसाठी व्हा.चेअरमन श्री.दत्तात्रय साताळकर, सन्माननीय संचालक श्री.माणिक मढवई, श्री.चांगदेव खैरे, श्री.हरिश्चंद्र जाधव, श्री.मच्छिंद्र आवारे, श्री.वाल्मिक नागरे, श्री.दिनेश धात्रक, श्री.मगन वारुळे, श्री.दीपक खरे, श्रीमती कालिंदी आहेर, श्री.बाळकृष्ण गायकवाड व श्री.सुधाकर शेलार आदी प्रयत्नशील होते. सभेस श्री.सुनील गायकवाड, श्री.अंबादास सालमुठे, श्री.सचिन मुंढे, श्री.संतोष दाभाडे, श्री.महेश जगदाळे, श्री.डी.एम. गिरासे, श्री.जे.सी. वळवी, श्री.रविंद्र पटेल, श्री.युवराज घनकुटे, श्री.संजय सानप, श्री.कैलास पवार, श्री.चंद्रकांत बर्डे आदींसह सभासद बंधु-भगिनी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने