स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून तळागाळातील जनतेचे प्रश्न सोडवा - जिल्हाध्यक्ष अनिल सोनवणेस्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून तळागाळातील जनतेचे प्रश्न सोडवा - जिल्हाध्यक्ष अनिल सोनवणे
येवला   : -प्रतिनिधी 
स्वभामनी रिपब्लिकन पक्षाची स्थापणाच मुळात तळागाळातील जनतेसाठी झाली असून कार्यकर्त्यांनी त्यांच्या समस्यांकडे अधिक लक्ष द्यावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष अनिल सोनवणे यांनी तालुक्यातील सावरगाव येथे बोलताना केले.
सावरगाव येथे जिल्हाध्यक्ष अनिल सोनवणे व अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख तैय्यब शेख हे दौऱ्यावर आले होते.त्यावेळी जाधव बोलत होते.  स्वारिप पक्षावाढीसाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत यासह पुन्हा एकदा पक्ष प्रणेते मनोजभाई संसारे यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचविन्यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले.   सदर बैठकीप्रसंगी मोठया प्रमाणात पदाधिकारी उपस्थित होते. 
सावरगावचे सरपंच सोपान किसन पवार, यादव पवार , शैलेष पगारे, अनिल घोडेराव, मनोहर गोतीस, आकाश गोतीस, अरूण पगारे,मिलीद घोडेराव,मुकूंद घोडेराव, गौतम पगारे, संजय लोखंडे, सचिन शेलार , रामा काळे, स्वातीताई पगारे माजी सरपंच, संगिताताई घोडेरेव, ग्रामपंचायत सदस्य, मंदाबाई साळवे, जयश्री बोरके,शोभाताई घोडेराव  , सारिका पगारे, दिमाबाई पगारे व मोठया संख्येने पदाधिकारी  उपस्थित होते.अनिल घोडेराव यांनी सूत्रसंचालन केले तर शैलेश पगारे यांनी आभार मानले.

थोडे नवीन जरा जुने