भक्ती सांगळे हिची थाळीफेक आणि गोळाफेक स्पर्धेसाठी जिल्हास्तरावर निवडविद्या  इंटरनॅशनल शाळेची खेळाडू कु.भक्ती सांगळे हिची जिल्हास्तरीय थाळीफेक आणि गोळाफेक स्पर्धेसाठी निवड
येवला : प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचलनाय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे कार्यालय अंतर्गत दि.20/9/2018 रोजी मुलीच्या 14 वर्ष वयोगटातील तालुकास्तरीय थाळीफेक आणि गोळाफेक क्रीडा स्पर्धा नुकत्याच तालुका क्रीडा संकुल येथे पार पडल्या. या स्पर्धेत तालुक्यातील एकूण 70 मुलींना सहभाग नोंदविला.स्पर्धेत विद्या शाळेतील इयत्ता आठवणीतील विध्यार्थीनी कु.भक्ती दिनेश सांगळे हिने उत्कृष्ट अशी थाळी आणि गोळा फेकून तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला तिची नासिक येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय थाळीफेक स्पर्धेसाठी संघात निवड झाली.भक्ती हिच्या निवडीबद्दल  विद्या संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजेश पटेल सर, डॉ.संगीता पटेल विद्या इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका शुभांगी शिंदे मॅडम,शुभांगी राजनकार यांनी अभिनंदन करून तिला पुढील नासिक येथे होणाऱ्या जिल्हस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.यशस्वी विद्यार्थिनीला शाळेतील क्रीडाशिक्षक किरण कुलकर्णी,मोईज दिलावर,अजय पारखे व शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारीवृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले

थोडे नवीन जरा जुने