वीज चोरी पकडली म्हणून अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

येवला :
तालुक्यात देवरगाव येथे वीज चोरी पकडली म्हणून अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला मारहाण करण्यात आली. यावेळी चोरी केलेल्यांनी कार्यकारी अभियंत्‍यांच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचाही प्रयत्न केला. यामध्ये मारहाण झालेल्या कार्यकारी अभियंत्यांचे नाव सुरेश जाधव असे आहे. यावेळी महिला कर्मचार्‍यांनाही मारहाण झाली असल्याचे सांगण्यात आले आहे.  
थोडे नवीन जरा जुने