बी एच आर च्या ठेवीदारांचा येवल्यात रविवारी मेळावा महाराष्ट्र राज्य ठेवीदार संघर्ष समितीचे पदाधिकारी मार्गदर्शन करणारबी एच आर च्या ठेवीदारांचा येवल्यात रविवारी मेळावा
महाराष्ट्र राज्य ठेवीदार संघर्ष समितीचे पदाधिकारी मार्गदर्शन करणार
येवला : प्रतिनीधी 
बी एच आर च्या ठेविदारांचा रविवारी शहरातील कन्यादान लॉन्सवर मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याला महाराष्ट्र राज्य ठेवीदार संघर्ष समितीचे पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.
शहरातील नगर मनमाड राज्यमहामार्गावरील कन्यादान लॉन्सवर दुपारी १२ वाजता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्र राज्य ठेवीदार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष अशोक मंडोरे व उपाध्यक्ष गिरीधर ढाभी हे ठेवीदारांना मार्गदर्शन करणार आहेत. बी एच आर मल्टिस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीवर २१ नोव्हेंबर २०१५ पासून अवसायकाची नेमणूक करण्यात आली असून तेंव्हापासून ठेवीदारांच्या रकमेबाबत कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही.त्यामुळे ठेवीदार संभ्रवावस्थेत आहेत.पुढील लढा कसा लढवयाचा याबाबत या मेळाव्यात विचारविनिमय करण्यात येणार आहे.म सदर मेळाव्याला बी एच आर पतसंस्थेच्या शहर व तालुका तसेच परिसरातील  ठेवीदारांनी उपस्थित रहावे असे आवाहन संजीव सोनवणे ,एस एम सानप ,कृष्णा शिंदे ,कोतवाल दादा , ए डी जगताप , एन .डी .कोल्हे  आदींनी केले आहे.


थोडे नवीन जरा जुने