उंदीरवाडी-बोकटे रस्त्यावर एस टी महामंडळाची बस पलटी...सुदैवाने जीवित हानी नाही....35 प्रवाशी किरकोळ जखमी




उंदीरवाडी-बोकटे रस्त्यावर एस टी महामंडळाची बस पलटी...सुदैवाने जीवित हानी नाही....35 प्रवाशी किरकोळ जखमी 
 
येवला : प्रतिनिधी
तालुक्यातील उंदीरवाडी-बोकटे रस्त्यावर एस टी महामंडळाची बस पलटी झाली. दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवित हानी झाली नाही. बसमधील शालेय विद्यार्थ्यासह एकूण 75 प्रवाशी होती. बसमधील 30 ते 35 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे.
तालुक्यातील बोकटे येथे येवला आगाराची बस मुक्कामी जात असते. व सकाळी 6 वाजता बोकटे वरून निघते. शनिवार 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता एम एच 14 बी टी 0553 बोकटे येथून निघाल्यानंतर उंदीरवाडी बोकटे रस्त्यावर भरधाव वेगाने जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने बस पलटी झाली. या बस मध्ये शालेय विद्यार्थ्यासह एकूण 75 प्रवासी होते.  दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नसून बसमधील 30 ते 35 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे. यावेळी जि.प. सदस्य महेंद्र काले, शिवसेना नेते संभाजीराजे पवार,मकरंद सोनवणे, बाबा डमाळे, सचिन कळमकर, दिलीप जाधव, किशोर देशमुख यांच्यासह ग्रामस्थांनी मदतकार्य करून जखमींना येवला,अंदरसूल ग्रामीण रुग्णालयासह काही खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 
याबाबत येवला आगारात विचारणा केली असता रस्त्यावर मोठे खड्डे असल्याने बसचा पाठा तुटला व बस पलटी झाल्याचे सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात घटनास्थळी असलेल्या ग्रामस्थांनी बस सुटण्यासाठी उशीर झाल्याने चालकाने भरधाव वेगाने गाडी चालवत होता. त्यामुळे गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने बस पलटी झाल्याचे सांगितले. 
मात्र याबाबत प्रशासनाने गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे. बोकटे-उंदिरवाडी रस्ता हा 8 ते 9 किमीचा आहे. 2 वर्षापूर्वी 5 ते 6 किमी रस्त्याचे काम झाले आहे. परंतु पुढील 2 ते 3 किमी चे काम हे आजही अर्धवट राहिलेले आहे. बसमधील प्रवासी यांच्या जीवाशी खेळण्यापेक्षा रस्ते दुरुस्ती व वेळेचे नियोजन करणे गरजेचे असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
=======================================
ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी बसने येवल्याला येतात.बस चालकांनी प्रत्येक गावातून वेळेवर बस काढावी.व संतुलित वेगाने बस चालवावी.म्हणजे बसही वेळेवर सुरक्षित धावतील.व विद्यार्थीही वेळेवर शाळेत पोहचतील.बसच्या प्रकृतीदेखील बिघाड झालेले असतात.याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
दत्ता महाले 
प्राचार्य,एन्झोकेम हायस्कूल येवला 
==============================



 

थोडे नवीन जरा जुने