वारकऱ्यांच्या गाडीला येवल्याजवळ अपघात

वारकऱ्यांच्या गाडीला येवल्याजवळ अपघात
येवला : प्रतिनिधी
पंढरपूर वरून परतणाऱ्या वारकऱ्यांच्या गाडीला येवल्याजवळ अपघात झाला असून या अपघातात मालेगाव तालुक्यातील ८ जण जखमी झाले आहेत . येवला – नगर – मनमाड महामार्गावर येवल्यानजीक अंचलगाव पाटी जवळ पिंपळगाव जलाल शिवारात पंढरपूर वरुन परतनाऱ्या पिकअप गाडीला रविवारी सकाळी अपघात झाला.यात ८ भाविक जखमी तर तिघांची प्रकृती चिंताजनक  आहे.मालेगाव तालुक्यातील पाडळदे येथील वारकरी पंढरपूर येथून दर्शन घेऊन घरी परतत होते.
रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास पिकअप गाडी (एमएच ४,सीपी २४४७) व मालवाहू ट्रक (केए २५, डी-७८०८) चा अपघात झाला. ट्रकने पिकअपला धडक दिली. पीक अपमध्ये १८ वारकरी होते, त्यांपैंकी आठ जण जखमी झाले आहेत.त्यांच्यावर येवला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे जखमीपैकी काही जखमींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुभाष आहेर व निस्सार लिंबुवाले यांनी धावपळ करून जखमी रुग्णांचा संपर्क त्यांचे घरी करुन त्यांना मालेगावला हलवण्यासाठी मदत केली .
थोडे नवीन जरा जुने