स्वाभिमानी रिपब्लिकनचे उपोषण

स्वाभिमानी रिपब्लिकनचे उपोषण
 येवला : प्रतिनिधी
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने विविध मागण्यां साठी शहरातील विंचूर चौफुली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर आज दि. १६ मंगळवार रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. मागण्यांचे निवेदन स्विकारुन तहसिलदार रोहिदास वारुळे यांनी या मागण्यांचा संबधितांकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्‍वासन दिल्याने माजी आमदार मारोतराव पवार, पंचायत समिती उपसभापती रुपचंद भागवत व तहसिलदार वारुळे यांच्या हस्ते सरबत देउन उपोषण सोडण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेतील वाढीव निधी देऊन मागेल त्या  लाभर्थ्याला लाभ देण्यात यावा. शहरातील विंचुर चौफुली वरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात यावे, तेथील अतिक्रमण काढण्यात यावे. जुने तहसील कार्यालय येथे प्राथमिक आरोग्य केंद्र (मोहल्ला क्लिनिक) सुरु करण्यात यावे. धुळगाव येथे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचे काम मंजूर असूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने ही कामे त्वरित सुरु करावी. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना तालुक्यात राबविण्यात यावी, या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे लाभार्थी वंचित आहे. या प्रकरणी यापूर्वी वेळोवेळी निवेदन देऊनही या दुर्लक्ष केल्याने लाक्षणिक उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला. या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. या उपोषणास स्वारीपचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे, विजय घोडेराव, नगरसेवक अमजत शेख, शशिकांत जगताप, अजीज शेख, जलील कुरैशी, अजहर शेख, आशा आहेर, वाल्हुबाई जगताप, रंजना पठारे, गीताराम आव्हाड, बाळासाहेब आहेर, शहर काझी रफियूद्दीन, हमजा अन्सुरी, मंगेश भगत, आकाश घोडेराव, विनोद त्रिभुवन, वसंत घोडेराव, हरि आहिरे, बाळु आहिरे, दिपक गरुड, भाऊराव धिवर, कांताबाई गरुड, ज्योती पगारे, नंदीनी पगारे, ताराबाई गायकवाड, सुमनबाई पवार, मंदा पगारे आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
थोडे नवीन जरा जुने