विद्या इंटरनॅशनल स्कूलच्या तीन खेळाडूंची शालेय कॅरम स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड




विद्या इंटरनॅशनल स्कूलच्या तीन खेळाडूंची शालेय कॅरम स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड

येवला : पुढारी वृत्तसेवा

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवकसेवा संचालनाय महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद नाशिक, आयोजित जिल्हास्तरीय 14-17-19 वयोगटाखालील मुले व मुली यांच्या शालेय कॅरम स्पर्धा नुकत्याच 18 व 19 नोव्हेंबर रोजी एकूण 126 विद्यार्थ्यांच्या सहभागाने छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे मोठ्या उत्साहात व अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्यात.
सदर स्पर्धेत विद्या इंटरनॅशनल स्कूलचे 14  वर्षाखालील वयोगटातील खेळाडू विद्यार्थिनी आर्या कासलीवाल 17 वर्षाखालील वयोगटात खुशी अग्रवाल,श्रुष्टी ललवाणी, यांनी शिवाजी स्टेडियम नासिक येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत उत्कृष्ट अशा खेळाचे प्रदर्शन करून नासिक विभागीय संघात स्थान मिळवले.व त्यांची पुढील महिन्यात होणाऱ्या विभागीय कॅरॅम स्पर्धेसाठी त्याची नासिक विभागीय संघात निवड झाली. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक डॉ.राजेश पटेल ,डॉ.संगीता पटेल ,शाळेच्या प्राचार्या सौ.शुभांगी शिंदे मॅडम,आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात. सदर खेळाडूंना शाळेचे क्रीडाशिक्षक किरण कुलकर्णी,मोईज दिलावर,व अभिलाष अहिरे यांचे मार्गदर्शन लाभले,.
थोडे नवीन जरा जुने