येवला तालुक्यातील सोमठाणा देश येथे रास्ता रोको करत सरकारच्या प्रतीकात्मक तिरडीचे दहन...आरक्षण मिळेपर्यंत सर्व मतदानावर बहिष्कारचा निर्णय


येवला तालुक्यातील सोमठाणा देश येथे रास्ता रोको करत
सरकारच्या प्रतीकात्मक तिरडीचे दहन...आरक्षण मिळेपर्यंत सर्व मतदानावर बहिष्कारचा निर्णय

येवला - पुढारी वृत्तसेवा

जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणास पाठिंबा म्हणून आज सोमठाण देश येथे सकल मराठा समाजाच्या वतीने संपूर्ण गाव बंद पाळण्यात आला. तालुक्यातील संपूर्ण मराठा समाज आरक्षण विरोधी नेत्यांच्या विरोधात त्यांची तीरडी यात्रा काढण्यात आली. यावेळी संपूर्ण गावांमधून मोठ्या बहुसंख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी सहित गावातील महिला पुरुष तालुक्यातील सकल मराठा समाज या आक्रोश मोर्चासाठी उपस्थित होता.
 अधिकाऱ्यांनी या मोर्चाची दखल न घेतल्याने येथे रस्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. त्यानंतर तिरडी गाव मधून घोषणा देत ग्रामपंचायत समोर आणण्यात आली. ग्रामपंचायत पास केलेल्या ठरावाचे वाचन झालं जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय नेत्याला गावात बंदी असेल, आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावातील मराठा समाजाने मतदानावर बहिष्कार राहील असा ठराव ही करण्यात आला.
मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकण्यासह राजकीय लोकप्रतिनिधींना सोमठाण देश गावामध्ये गाव बंदीचा ठराव मंजूर करण्यात आले आहेत.केदारनाथ नवले,गोरख कदम,वसंत घनगाव, भाऊसाहेब कदम,
दिगंबर कदम,नवनाथ घनगाव, संभाजी कदम,रंगनाथ ढगे, बाळकृष्ण घनगाव,आनंदा घनगाव, भानुदास घनगाव,अभिषेक कदम, पुंडलिक कदम,सुयश कदम,विठ्ठल पिंपळे,अंबादास कदम,गोरख कुंदे, आदींसह शेकडो समाज बांधव आंदोलनात सहभागी झाले होते.या आंदोलनामुळे तालुक्यात पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीने जोर धरला असून गावचे ग्रामस्थ समाज बांधव आक्रमक होऊ लागले आहे.
फोटो
थोडे नवीन जरा जुने