सरकारी नोकऱ्यांमध्ये खाजगीकरणाला विरोध करत राष्ट्रवादीकडून शासकीय आदेशाची होळी


सरकारी नोकऱ्यांमध्ये खाजगीकरणाला विरोध करत राष्ट्रवादीकडून शासकीय आदेशाची होळी

येवला  : पुढारी वृत्तसेवा

राज्य सरकारने सरकारी नोकर भरतीमध्ये खाजगी कंपन्यांना कंत्राट देऊन सरकारी नोकऱ्यांचे खाजगीकरण करत असल्याचा गंभीर आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट येवला शहर व तालुका यांच्या वतीने विंचूर चौफुली येथे या शासकीय आदेशाची होळी करण्यात आली.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या निदर्शनांना सुरुवात झाली. विंचूर चौफुली येथे पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आदेशांची होळी केली . दोन चार लोकांच्या खाजगी कंपन्यांना लाभ देण्यासाठी शासकीय खर्च बचतीच्या नावाखाली शासनाने युवकांच्या आयुष्याशी खेळू नये. शासन हे खाजगी कंपन्यांच्या नफ्यासाठी नसावे तर कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेवर आधारलेले असावे, त्यामुळे शासनाने हा जीआर त्वरित रद्द करावा अशी मागणी यावेळी  राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गट चे प्रदेश उपाध्यक्ष शाहू शिंदे यांनी केली. याप्रसंगी राष्ट्रवादी चे शहरअध्यक्ष योगेश सोनवणे , अल्पसंख्यांक आघाडीचे एजाज शेख, शंभू शिंदे, नारायण गायकवाड,साईनाथ मढवई,राहुल शिंदे, मिलिंद पाटील, अकबर शहा, कालू शेख,निलेश भदाणे, आदी  उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने