एस एन डी.कृषी विद्यालयातील कृषीकन्यांनी घेतले धुळगाव येथे वृक्षलागवड व मार्गदर्शन शिबिर

 

एस एन डी.कृषी विद्यालयातील  कृषीकन्यांनी घेतले धुळगाव येथे वृक्षलागवड व मार्गदर्शन शिबिर...

येवला  :  



 तालुक्यातील धुळगाव येथे एस एन डी बाभूळगाव कृषि महाविद्यालयातील बी. एससी ॲग्रीच्या तिसऱ्या वर्षातील कृषि कन्यांनी 'रावे' (ग्रामीण कृषि कायार्नुभव) उपक्रमातंर्गत शनिवार (दि.१३) रोजी वृक्षारोपण व कृषी सल्ला विषयी मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी येथील ग्रामपंचायत कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आम्हा कडुलिंब गुलाब इत्यादी वनस्पती युक्त झाडांचे वृक्षारोपण करून शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील सरपंच वंदना गायकवाड ह्या होत्या तसेच प्रमुख उपस्थितीत म्हणून शिवसेनेचे तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके पाटील होते.यावेळी प्रगतीशील शेतकरी राजेंद्र गायकवाड व कैलास खोडके यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कृषि कन्या कु.कृतिका काकड हिने कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.याप्रसंगी राजेंद्र गायकवाड यांनीही आपले विचार व्यक्त करीत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचलन कु.राधिका धामणे हिने केले. तर आभार कु. निकिता गोसावी हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषिकन्या ज्ञानेश्वरी, दिघे,कृतिका काकड,राधिका धामणे,निकिता गोसावी 
 यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाला गावातील शेतकरी व ग्रामस्था मोठया संख्येने उपस्थितीत होते.ग्रामीण कृषि कायार्नुभव अंतर्गत या कार्यक्रमासाठी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डी.पी.कुळधर यांनी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने