येवला विंचूर चौफुलीतील अतिक्रमण हटविले गेले


येवला शहरातील राज्य मार्गालगत असणारी अतिक्रमणे सार्वजनिक बांधकाम विभागाने बुधवारी जमीनदोस्त केली. येवला-मनमाड महामार्गालगत अनेक दिवसांपासून व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली होती. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता विलास पाटील आणि कर्मचाऱ्यांनी सकाळी 11 वाजता रस्त्यालगतची अतिक्रमणे पाडण्यास सुरुवात केली. या वेळी पथकाने सामानही जप्त केले. शाखा अभियंता एम. एस. सोनजे, प्रशांत अहिरे, जाधव, वसंत घोडेराव यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली





टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने