येवला येथील सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेली संस्था जनकल्याण सेवा समिती ने बाभुळ गांव येथे कष्टकरी महिलाकडे जाऊन रक्षाबंधन साजरे केले. या वेळेस प्रत्येक भगिनीला साडी भेट देण्यात आली. यावेळी नारायण मामा शिंदे, प्रभाकर झळके, सुधिर गुजराथी, बंडु क्षिरसागर, दत्ता नागडेकर, भावसार व जनकल्याण सेवा समिती चे सभासद उपस्थित होते.