नवरात्रोत्सवानिमित्त देशभर स्त्रीशक्तीचा जागर घुमत असताना आईनेच आपल्या सव्वा महिन्याच्या बालिकेची हत्या केल्याची घटना येवला -कोपरगाव रोडवरील नव्या तहसील कार्यालयासमोर शनिवारी दुपारी घडली. सुरुवातीला घरात शिरलेल्या चोरट्याने हाती काहीच न लागल्याने मुलीचा खून केल्याचा बनाव आईने केला. परंतु पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर दुसरीही मुलगीच झाल्याने आईनेच मुलीची हत्या केल्याचे उघड झाले. याप्रकरणी आईला अटक करण्यात आली आहे.
नांदगाव तालुक्यातील खिडीर्भवर येथे राहणारी वैशाली अरुण आहिरे ही बाळंतपणासाठी माहेरी येवल्यात आली होती. तिचे वडिल वसंत मोतीराम घोडेराव सार्वजनिक बांधकाम विभागात शिपाई आहेत. दुपारच्या वेळेत आई वडील व दोन लहान भाऊ बाहेर गेल्यानंतर तिने आपल्या सव्वा महिन्याच्या मुलीची हत्या केली.
सुरुवातीला चोरट्यांनी लहानग्या मुलीला दगडी पाट्याचा वापर करत ठार मारल्याची बातमी पसरली. याबाबत येवल्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. परंतु काही तासांतच आईने बालिकेला ठार केल्याचे उघड झाल्यानंतर सर्वांची मने हेलावली. मनमाडचे पोलिस उपअधीक्षक समाधान पवार यांच्यासह पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत खरा प्रकार अवघ्या चार तासांत उघड केला.