येवल्यातील निर्माती व कलाकार यांचा ‘चिनू’ या मराठी चित्रपटाचा प्रिमीयर शो

आदिवासी तरुणीच्या संघर्षावर आधारित ‘चिनू’ या मराठी चित्रपटाचा प्रिमीयर शो शुक्रवारी सायंकाळी नाशकात मुख्य नायिका तेजस्विनी लोणारी व अभिनेता शरद केळकर यांच्या उपस्थितीत पार पडला. चित्रपट नाशिककरांच्या पसंतीस उतरला असून, संपूर्ण टीम नाशिकची असल्याने त्यांच्या कलागुणांचे कौतुक करण्यासाठी अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.
झी टॉकीज प्रस्तुत शिवलीला फिल्म्सचा ‘चिनू’ हा चित्रपट शुक्रवारी महाराष्ट्रातील चित्रपटगृहात झळकला. कॉलेजरोड येथील सिनेमॅक्स चित्रपटगृहात शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता प्रिमीयर शो झाला. यावेळी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी, प्रथमच मराठीत पदार्पण करणारा अभिनेता शरद केळकर, लेखिका-दिग्दर्शिका निलीमा लोणारी, निर्माता शिवम लोणारी, कलादिग्दर्शक अरुण रहाणे, गीतकार प्रकाश होळकर, मिलींद गांधी, झी मराठीचे प्रमुख निखील साने, ओंकार रानडे उपस्थित होते. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते या संपूर्ण टीमचा यावेळी सत्कार करण्यात आला. आदिवासी तरुणी चिनूची मुख्य भूमिका तेजस्विनीने साकारली असून, तिला असलेले शहराचे आकर्षण, वास्तव व तिचा संघर्ष चित्रपटात बघावयास मिळतो


थोडे नवीन जरा जुने