कृषी अधिकारी अशोक कुळधर वर फौजदारी गुन्हा दाखल करा................

कृषी अधिकारी अशोक कुळधर वर फौजदारी गुन्हा दाखल करा................
नाजि.सह.बॅकेचे संचालक अँड. माणिकराव शिंदे, पंचायत समितीचे माजी सभापती तथा विद्यामान सदस्य संभाजी पवार, शिवसेनेचे शहराध्यक्ष राजेंद्र लोणारी आदींनीजिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे पत्राद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, जुन्या पंचायत समिती कार्यालयात कपाशीवाण बी.टी.7351 चे मूळ 930 या किंमतीला प्रत्येक शेतकर्‍यास
 1 पाकीट याप्रमाणे वाटप करण्यात येईल, असे वर्तमानपत्राद्वारे तसेच
 अनेक शेतकर्‍यांना एसएमएसद्वारे जाहीर आवाहन तालुका कृषी अधिकारी
 अशोक कुळधर यांनी त्यांच्या अधिकारात वरिष्ठांचा कोणताही आदेश
नसताना केले. 7351 चे अडीच हजार पाकीट केवळ आजच एका दिवसात
 हे वाटप आहे, असे आवाहनात नमूद केले. हे सर्व करण्यापूर्वी पोलीस
 दलाच्या बंदोबस्ताच्या दृष्टीने कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नाही.
त्यामुळे आवाहनाला प्रतिसाद देत बियाणे खरेदी करण्यासाठी हजारो शेतकरी जमले. बियाणे विक्री सुरू होण्या दरम्यान गोंधळ उडाला व
शेतकर्‍यांनी चौफुलीवर आंदोलन केले. अशोक कुळधर यांनी स्वत:ला प्रसिद्धी मिळावी, भविष्यात व्यापार्‍याच्या संगतमताने बियाणे वाटपात काळाबाजार करीत भ्रष्टाचार करता  यावा याकरीता हे सर्व केले असल्याच्या आरोप निवेदनात केला आहे. या सर्व घडलेल्या घटनेला कृषी अधिकारी कुळधर हेच बेजबाबदारपणाने वागले. त्यामुळे त्यांना निलंबित करावे, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, असे निवेदनात म्हटले आहे. कुळधर हे अधिकारी येवले तालुक्यातील रहिवासी आहेत. येवला येथे त्यांना राहता येत नाही, असाही उल्लेख निवेदनात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने