दै.पुण्यनगरीच्या बातमीवर आधारित..............
येवला येथील एका प्रतिष्ठीत राजकारण्यासह चौघांना शनिवारी रात्री स्वस्त सोन्याच्या आमिषाने सात-आठ जणांच्या टोळीने बेदम मारहाण करून तब्बल 5 लाख रुपयाला लुटल्याची घटना घडली आहे.या प्रतिष्ठीतांची नाशिक पासिंगचा नंबर असलेली बोलेरो जीप सोनई पोलिसांना मिळाली आहे. मात्र जीपमधील लोक घटनेनंतर गायब झाले असून त्यांना जबाबासाठी बोलावण्यात आल्याची माहिती सोनईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक फुंडकर यांनी दिली.नेवासा फाटा, फत्तेपूर, खडका हा भाग सोनेरी टोळीच्या कारवायांसाठी प्रसिद्ध आहे. स्वस्त सोन्याच्या आमिषाने या टोळीने आतापर्यंत नाशिक, मुंबई, पुणे व मराठवाडय़ातील अनेकांना गंडविले आहे. मार खाऊन हे लोक गप्प राहिले. काही जणांनी पोलिसांकडे फिर्यादी दिल्या. बाकी बहुतेक जणांनी प्रतिष्ठा आणि इज्जतीपायी मार खाऊन व जवळचा पैसा आडका जाऊन गप्प राहणे पसंत केले. शनिवारच्या घटनेतील येवल्याचे प्रतिष्ठीतही यातलेच निघाले, पण त्यांची बोलेरो जीप सोनई पोलिसांना सापडल्याने त्यांना आता जबाब द्यावा लागणार आहे. तब्बल 5 लाख रुपयांना हे लोक लुटले गेलेले आहेत.