विलासराव देशमुख यांच्या सारख्या सरपंचपदापासून मुख्यमंत्री ते केंद्रिय मंत्री एवढा दिर्घ प्रवास केलेल्या नेत्याचे निधन मनाला तीव्र वेदना देणारे आहेत. त्यांचे व माझे राजकारणापलिकडील निखळ मैत्रीचे होते. वसंतराव नाईकानंतर दिर्घकाळ मुख्यमंत्री पदावर राहिलेले विलासराव अजातशत्रू होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्र एका प्रेरक शक्तीला मुकला आहे अश्या शब्दात मा.छगन भुजबळांनी आपला शोकसंदेश व्यक्त केला आहे. आघाडीच्या राजकारणाचा धर्म कसा पाळावा याचे ते उत्तम उदाहरण ते आहेत. राजकिय सामाजिक सांस्कृतिक कला सहकार या बाबत त्यांच्या नेहमी सकारात्मक दृष्टीकोन होता. ते एक अजातशत्रू आणि रसिक व्यक्तिमत्व होते. त्यांच्या मनिधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे असेही त्यांनी आपल्या शोकसंदेशात मत व्यक्त केलेय
विलासराव देशमुख यांचे अकाली निधन मनाला तीव्र वेदना देणारे................ छगन भुजबळ
byअविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे
-
0