येवला शहर भाजपा-शिवसेनेचे तहसीलदारांना निवेदन.............चार दिवसांत चोरटय़ांना गजाआड करा

येवला - कोटमगाव येथील सर्वसामान्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जगदंबा देवीचे दागिने व दानपेटीतील पैसे चोरीस गेले. सदर दुर्दैवी प्रकार घडून तीन दिवस झाले, तरी अद्यापपावेतो चोरांना पकडण्यात तपास यंत्रणेला यश आले नाही. येत्या चार दिवसात तपास यंत्रणेने या चोरटय़ांना गजाआड केले नाहीतर भाजपा शिवसेनेच्या वतीने कोणत्याही क्षणी येवला बंद करण्यात येईल असा इशारा तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

सदर चोरी प्रकरणी पोलीस पथके ठिकठिकाणी तपासाकामी पाठविली असली तरी अद्याप कुठलेही यश आले नाही. तपास यंत्रणेला सतर्क करुन येत्या चार दिवसात चोरांना पकडून कारवाई करण्यात यावी, अन्यथा त्याच्या निषेधार्थ कोणत्याही क्षणी येवला बंदचे आवाहन केले जाईल असा इशारा निवेदनात दिला आहे. निवेदनावर शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, भाजपा शहरप्रमुख मनोज दिवटे, भाजपा नेते, ान्धनंजय कुलकर्णी, बंडू क्षिरसागर, बाबासाहेब कोटमे, युवा सेनेचे रुपेश लोणारी, विशाल काथवटे, राम बडोदे, महेश सरोदे, पंकज पहिलवान, नितीन वडे, किरण भांडगे, शैलेश हिरे आदी पदाधिकार्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.
थोडे नवीन जरा जुने