येवल्यात राष्ट्रीय युवा सप्ताह सुरू

येवला- येथील खटपट युवा मंच व युवा विकास केंद्राच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय युवा सप्ताहाला प्रारंभ झाला आहे. व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, बी. आर. लोंढे, नवृत्ती हाबडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. नेहरू युवा केंद्र व जिल्हा क्रीडाधिकारी यांच्या सहकार्याने शहरात राष्ट्रीय युवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी विवेकानंदांच्या वेशभूषेत पराग ढोमसे, याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.
प्रास्ताविक मंच अध्यक्ष मुकेश लचके यांनी, तर सूत्रसंचालन प्रा. दत्तात्रय नागडेकर यांनी केले. याप्रसंगी नारायणराव शिंदे, नंदलाल भांबारे, बंडू क्षीरसागर, सोमनाथ खंदारे, गोविंद लचके, धनंजय कुलकर्णी, बी. के. बाफणा आदि उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने