इगतपुरीचा हितेश ठरला 'येवला श्री' चा मानकरी

येवला-तरुणांमध्ये बलसंवर्धनाची आवड निर्माण व्हावी म्हणून धडपड मंच, लक्ष्मीनारायण राठी बहुउद्देशीय सेवा संस्था व नाशिक जिल्हा शरीर सौष्ठव संस्था यांचे संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेली नाशिक जिल्हा शरीर सौष्ठव स्पर्धा येवला क्रीडा संकुलामध्ये उत्साहात पार पडली.

स्पर्धेचा शुभारंभ नगराध्यक्ष नीलेश पटेल व अशोक देशपांडे यांचे हस्ते करण्यात आला. या स्पर्धेत जिल्हाभरातून आलेल्या ७२ अव्वल शरीर सौष्ठवपटूंनी संगीताच्या तालावर एकाहून एक सरस पोझ देत आपले कसब पणाला लावले. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा कार्यक्रम बघण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी लोटली होती. पारितोषीक वितरण नगराध्यक्ष पटेल व देशपांडे यांचे हस्ते झाले. इगतपुरी येथील हितेश निकम यांनी येवला श्री २0१३ किताब पटकावला. मोस्ट इम्प्रुव्हड बॉडी बिल्डर पुंडलिक निम तर बेस्ट पोझर म्हणुन उबेदूर रहेमान यांची निवड करण्यात आली.

स्पर्धेत ५५ किलो गटात नितिन बागूल (नाशिक), नाहीद अन्जुम, मेहताळा आलम, नाहिर अहेमद, रफिक अहेमद (सर्व मालेगाव), ६0 किलो गटात पवन पवार (इगतपुरी), श्रीराम जाधव (ना.रोड), आकाश महाले (मनमाड), ६५ किलो गटात ऊबेदुर रहेमान (मालेगाव), इकबाल अहेमद (मालेगाव), खलिल अहेमद (मालेगाव) रिझवान शहा (मालेगाव), नीलेश तायडे (नाशिक), ७0 किलो गटात श्रीकांत राव (नाशिक), जाकिर सलिम (मालेगाव), शाहरुख पिंजारी (मालेगाव), अन्सारी सय्यद (मालेगाव), प्रविण मोरे (मालेगाव), ७५ किलो वजनी गटात हीतेश निकम (इगतपुरी), पुंडलिक सदगीर (नाशिक), शब्बीर खान (मनमाड), श्रीकांत शेरताटे (नाशिक), विक्रांत जामदार (मालेगाव) आदींची प्रत्येक वजनी गटातून निवड करण्यात आली.

सूत्रसंचालन सातपूरकर यांनी केले. परिक्षक म्हणून नारायण निकम, प्रल्हाद गोविंद, श्रीकांत क्षत्रिय, धनंजय काळे, हेमंत साळवे, पिंकी पाटील, आरीस लईक अहमद यांनी काम पाहिले.

प्रास्तविक प्रभाकर झळके यांनी केले. यावेळी रामदास दराडे, रिजवान शेख, भूषण लाघवे, किशोर सोनवणे, बाफणा, डॉ. खांगटे, राजू लोणारी, नारायण शिंदे, दत्तात्रय नागडेर, नंदू भांबरे आदी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रभाकर आहिरे, मुकेश लचके, गोपाळ गुरगुडे, स्वप्निल मिस्किन, अनिल आहिरे, महेश कांबळे, मयूर पारवे, रमाकांत खांबरे, अनिकेत पावटेकर, दत्ता कोटमे, नंदू पारवे यांनी परिश्रम घेतले.
थोडे नवीन जरा जुने