नगरसुल येथे डेंग्युसदृश रूग्ण आढळल्याने ेसावरगांव प्राथमिक आरोग्य
केंद्र कडून नगरसूल गांव तसेच परिसरात आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली,
मात्र तपासणीअंती डेग्यू नसल्याचे निष्पन्न झाले.
येवला तालुक्यातील नगरसूल येथिल सावरगांव रोड पवार वस्तीवरील कैलास कारभारी पवार (वय-४६) हे आजारी पडल्याने येवला येथिल खासगी दवाखान्यात उपचार घेत असतांना संबंधित डॉक्टरांनी त्यांना डेंग्यूसदृश असल्याच्या संशयावरून नाशिक येथिल सुयश हॉस्पिटल मध्ये पाठविले त्यांची तपासणी केली असता, डेंग्यू नसल्याची माहिती सावरगांव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. एस.आर. कांबळे यांनी दिली. नगरसूल गावांत व परिसरात सावरगांव प्राथमिक आरोग्य केंद्राकडून आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात आली असून यामध्ये हिवताप, डेंग्यू चिकुन गून्याविषयी ग्रामस्थांच्या घरोघरी जाऊन जनजागृती तसेच सर्वेक्षणही करण्यात आले. ह्या मोहिमेत लोकांना पसिरातील सांडपाणी, गटारी आदी विषयी माहिती देण्यात आली असल्याचे प्रा.आ.केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. एस.आर.कांबळे, पी.एस.जगताप (प्राथमिक),आर.एन. पात्रे (आरोग्य सहाय्यक) डॉ.एन.आर. चव्हाण तसेच आरोग्य सेविकांनी सहभाग घेवून मोहीम यशस्वीरित्या राबविली.