येवल्यात गुरुवारपासून श्रीराम कथा आनंद सोहळा

येवला-  येथील बालाजी गल्लीमधील श्री सुंदरराम मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त प.पू. विष्णू ज्ञानेश्‍ववर चक्रांकित महाराज यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली दि. ११ ते दि. १९ एप्रिल पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजता श्रींची मिरवणूक, दुपारी १२ वाजता चक्रांकित महाराज यांच्या उपस्थितीत आरती, ध्वजपूजन होईल. त्यानंतर दररोज पहाटे ५.३0 वाजता काकड आरती, दुपारी ४ वाजता श्रीराम रक्षा स्तोत्र पठण. रोज सायंकाळी ६ ते ८ वाजता चरित्र रघुनाथस्य त्र्यंबकेश्‍वर येथील जगदीश अरुणशास्त्री जोशी हे आपल्या रसाळ वाणीतून ऐकविणार आहेत. दि. १९ एप्रिल रोजी श्रीराम नवमीदिनी सकाळी ८ वाजता अभिषेक, १0 वाता श्रीराम जन्म कीर्तन ह.भ.प. विष्णूपंत मोरे महाराज करतील. दुपारी १२ वाजता श्रीरामजन्म महाआरती, सायंकाळी ६.३0 वाजता मंत्रजागर, रात्री ८ ते १0 देवमामलेदार माऊली भक्तपरिवाराची भजन संध्या, तसेच शनिवार दि. २0 रोजी सकाळी ११ वाजता महाआरती त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.
थोडे नवीन जरा जुने