राजापूर चे बीएसएनएलचे मोबाईल बंद

राजापूर  - येवला तालुक्यातील राजापूर येथील बीएसएनएलची मोबाईल सेवा दररोज दुपारी बंद राहत असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सेवा सुरळीत न झाल्यास कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा शिवसेना शाखाप्रमुख अशोक आव्हाड यांनी दिली आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून येथील कार्यालयातील बॅटरी नादुरुस्त असल्याने वीज असल्याशिवाय मोबाईल सेवा सुरू राहत नाही. त्याची दुरुस्ती न केल्यास कोणत्याही क्षणी कार्यालयास कुलूप लावण्यात येईल याची नोंद संबंधित अधिकार्‍यांनी घ्यावी, अशी मागणी अशोक आव्हाड यांनी केली.
थोडे नवीन जरा जुने