येवला औरंगाबाद मार्गावरील अंदरसूलला भिषण अपघात

येवला- दि.४ (प्रतिनिधी) येवला औरंगाबाद मार्गावरील अंदरसूल येथील स्वामी
हॉटेलजवळ आज दुपारी ३.३० च्या सुमारास स्कॉर्पियो (MH-04-BT-1212) व
फायरींग ट्रॅक्टर (MAF 9367) चा भिषण अपघात झाला. अपघातात ३ ठार तर ६
गंभीर जखमी झालेले आहेत. गंभीर जखमींना नाशिक सिव्हील हॉस्पिटल येथे
लगेचच दाखल करण्यात आले आहे. या अपघातात अय्युबखान खुदादाद खान वय-७८,
मेहेरुन्नीसा अय्युबखान वय ७३, तहेजीब फारुख खान वय ५५ हे तीघे रा.
भांडुप , मुंबई यांचा जागीच मृत्यू झाला तर श्रावण दगडू कांदळकर वय ४०
रा. अंदरसूल, फरद खान वय ४०, वकार खान वय १९, आयेशा खान वय ११, अजीजा
इरफान वय १३ रफिक सय्यद वय ४० सर्व रा. मुंबई यांना नाशिकला हलविण्यात
आलेले आहे. अपघातातील वाहनाची अवस्था भिषण असून वाहनांच्या काचा व दारे
पहारीने फोडून स्थानिक ग्रामस्थांनी अपघातग्रस्ताना बाहेर काढले. या बाबत
तालुका पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून पीएसआय माळी व त्यांचे
सहकारी तपास करीत आहेत.
अपघातातील मृतदेह येवला ग्रामिण रुग्णालयात आणले असता स्थानिक माजी
नगराध्यक्ष हुसेन शेख, नगरसेवक रिजवान शेख, दिपक सोनवणे, गुमानसिंग
परदेशी यांनी मृतांच्यानातेवाईकांशी संपर्क साधुन माहिती दिली.
थोडे नवीन जरा जुने