येवल्यातील खटपट मंचचा उपक्रम

खटपट युवा मंच व युवा विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने
बालदिनामित्त आयोजित कार्यक्रमात बालगोपाळ देशाचे पहिले पंतप्रधान पंडित
नेहरू यांच्या रम्य आठवणीत रमले. शिंपी गल्लीतील श्री संत नामदेव विठ्ठल
मंदिरात हा कार्यक्रम झाला.

व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांनी आपल्या विनोदी शैलीत चाचा नेहरूंच्या
कार्याविषयी माहिती सांगताना लहान मुलांना बालदिनाचे महत्त्व पटवून दिले.
जादूचे प्रयोग सादर करीत मुलांची करमणूकही केली. कार्यक्रमांच्या
सुरुवातीला पंडित नेहरूंच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार
अर्पण करण्यात येऊन अभिवादन केले. यानंतर खटपट मंचच्या वतीने 80 बालकांना
गुलाबपुष्प, नेहरू टोपी आणि खाऊंचे वाटप करण्यात आले. टोपी परिधान करून
बालकांनी एकच जल्लोष केला.
या प्रसंगी बी. एन. सोनवणे, सुनील आहिरे, ज्ञानेश टिभे, रमेश भांबारे,
रत्नाकर भांबारे, रमाकांत खंदारे, प्रसाद भडांगे, सोमनाथ लचके, डॉ. संतोष
जाधव, पांडुरंग खंदारे, दत्ता कोटमे, मंगेश माळवे, राहुल भांबारे आदी
उपस्थित होते. मंचचे अध्यक्ष मुकेश लचके यांनी प्रास्तविक व सूत्रसंचालन
केले. केरूजी तुपसैंदर यांनी आभार मानले.
थोडे नवीन जरा जुने