विद्यार्थ्यांची अदाकारीने श्रोते मंत्रमुग्ध उंदीरवाडी शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात

 


विद्यार्थ्यांची अदाकारीने श्रोते मंत्रमुग्ध

उंदीरवाडी शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात

 येवला  - वार्ताहर
उंदीरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत गुरुवारी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. बहारदार नृत्यांनी आपल्या पालकांची व मान्यवरांची मने जिंकली. यावेळी गटविकास अधिकारी सुनील आहिरे यांचे हस्ते विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या शब्दांशी मैत्री करतांना या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली दिपप्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सभापती प्रकाश वाघ, सदस्या राधिका कळमकर, जि. प. सदस्य महेंद्रकुमार काले, उपनगराध्यक्ष सुरज पटणी, राधाकिसन सोनवणे, विजय खैरनार, गटविकास अधिकारी आहिरे, शाम बावचे, सुजित सोनवणे, संदिप जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन कळमकर, सरपंच मोनिका चौधरी, उपसरपंच संजय देशमुख, सोसायटी चेअरमन सुभाष देशमुख, ग्रामपंचायत सदस्य विनोद जेजुरकर, अमोल क्षीरसागर, संगिता सोनवणे, भाऊसाहेब क्षीरसागर,  जगन क्षीरसागर, मारुती जेजुरकर, प्रभाकर चव्हाण, योगेश सोनवणे, मनोज जेजुरकर, कडु क्षीरसागर, बाळासाहेब देशमुख, देविदास धनवटे, बापू क्षीरसागर आदी उपस्थित होते.
मुलांनी एकापेक्षा एक सरस नृत्य सादर केली. यावेळी पालकांनी बक्षिसरुपी कौतुकाची थाप पाल्यांच्या पाठीवर दिली. मुलांच्या नृत्याची तयारी एस. व्ही. कराळे, एम. एल. आहिरे, व्ही. बी. शिरसाठ यांनी करुन घेतली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी  मुख्याध्यापक एम. एम गडदे, जी. एम. जाधव यांनी परिश्रम घेतले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन कळमकर यांनी आभार मानले.

थोडे नवीन जरा जुने