जयंत दिंडे यांनाच दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुख पदी नेमावे -- येवला शिवसेना

येवला - शिवसेनेने ऐन निवडणुकींच्या तोंडावर जयंत दिंडे यांची धुळे
जिल्हा संपर्कपदी नियुक्ती मुळे येवला शिवसेनेमध्ये नाराजीचे वातावरण
तयार झाले आहे. पक्षश्रेष्ठींचा निर्णय आम्हाला मान्यच आहे पण जयंत दिंडे
यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये पक्षाला पडतीच्या काळात चांगल्या संघटनाद्वारे
उर्जितावस्थेत आणले हे लक्षात घेता त्यांना दिंडोरी लोकसभा मतदार संपर्क
प्रमुख पदी ठेवावे ही मागणी शिवसैनिकांनी केली आहे.
भुजबळांच्या करिश्म्याने येवला तालुक्यातील संघटन वाढवइमअयात जयंत दिंडे
यांचे योगदान महत्वाचे होते. येवला तालुक्यात पुन्हा शिवसेनेचा भगवा
फडकावण्यासाठी जयंत दिंडे योग्य आहे ही मागणी येवला शिवसेना शहराध्यक्ष
राजेंद्र लोणारी,तालुकाध्यक्ष भास्कर कोंढरे, पंस सदस्य रतन बोरनारे,
विठ्ठलराव पिंपळे, तुळशीराम घनघाव,दिपक भदाणे,दत्तू खांडेकर,गोरख
भालेराव,चंद्रकांत शिंदे, बाळासाहेब पैठणकर, सुर्यभान हराळे, रमेश फरताळे
आदी शिवसैनिकांनी पक्षश्रेष्ठीकडे केली आहे.
थोडे नवीन जरा जुने