कांद्यावरील निर्यात मुल्य हटवा --- बाबा थेटे

येवला - कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी येवला शिवसेना तालुका उपप्रमुख
बाबा थेटे आणि युवा सेनेचे तालुकाध्यक्ष रुपेश लोणारी यांनी शासनाकडे
निवेदनाद्वारे मागणी केली आहे. ज्यावेळेस शेतकऱ्यांकडे कांदा नसतो
त्यावेळी कांद्याचे भाव वाढतात जेव्हा शेतकऱ्यांकडे कांदा उपलब्ध
होण्याची सुरुवात होते तेव्हा निर्यातमुल्य लादून भाव पाडले जातात .
शेतकरी हा सिंचन खात्याच्या नियोजन शुन्य व वीजेची उपलब्धता नसणे,
निसर्गाचो कोप, मजूराची भाववाढ यातून कसोशीने मार्ग काढुन कांदा पिकवतो
पण शासकिय धोरणामुळे तो कर्जबाजारी होत आहे. आज घसरलेल्या भावामुळे
अवाढाव्य खर्च करुन केलेले उत्पन्न घर घालून विकण्याची परिस्थिती
शेतकऱ्यावर आली आहे त्याला शासनाचे धोरण जबाबदार असल्याचे त्यांनी
निवेदनात नमुद केले आहे. याबाबत शासनाने न्याय्य भूमिका न घेतल्यास
शुक्रवार दिनांक ६ नोव्हेंबर २०१३ रोजी जळगाव नेऊर येथे नाशिक औरंगाबाद
महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा त्यांनी निवेदनात दिला आहे.
निवेदनावर बाबा थेटे, रुपेश लोणारी, मच्छिंद्र ठोंबरे,दशरथ गाढे, जनार्दन
गाढे,मधुकर गाढे,विलास वरे, भाऊसाहेब ठोंबरे,मच्छिंद्र वरे, मिननाथ
ठोंबरे,कचरू गाढे आदीसह शेतकर्यांच्या सह्या आहेत.
थोडे नवीन जरा जुने