चांगल्या विचारासाठी अध्यात्म हे साधन ---- प.पू कानिफनाथ महाराज

येवला - आपली मने अकार्यक्षम झाली आहे.आपण समाजात चांगले वागण्यासाठी
संस्काराची गरज आहे. चांगल्या संस्कारासाठी विचारही चांगले हवे आणि
चांगल्या विचारासाठी अध्यात्म हे साधन असे प्रतिपादन नरेंद्र महाराजाचे
उत्तराधिकारी प.पू कानिफनाथ महाराज यांनी गोशाळा मैदानावरील आपल्या
प्रवचनात केले. जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळ आयोजित
कार्यक्रमात ते बोलत होते. सुमारे अडीच तास सलग त्यांनी प्रवचन केले.
आईचे प्रेमाचे मोल हे अनमोल असते त्याची व्यापकता सांगता येते पण प्रमाण
सांगता येत नाही. माणसाने माणुस व्हावे , स्रियांचा सन्मान करावा,
व्यसनापासुन दूर रहावे. कोणते शास्र वाईट शिकवीत नाही त्यातून आपल्याला
पटेल तेवढे चांगले घ्यावे असेही ते म्हणाले . घर कसे बांधावे हे कोणीही
सांगेल पण त्यामध्ये आनंदी कसे रहावे हे कोणीही सांगत नाही तर ते
अध्यात्माची कास धरल्याने शिकता येते. प्रवचनासाठी रामदास वर्पे, कांचन
गोसावी, शैलेंद्र जाधव यांनी वाद्यवृंद चे काम केले.
सुमारे ५ हजार च्यावर भाविक कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रम
यशस्वितेसाठी कृष्णा शहाणे,शोभना निकम, रवि जाधव सुशिला केकाणे,शिवाजी
मिटके,राजू सुराशे,नवनाथ भोरकडे,अशोक जाधव,दत्तात्रेय शिंदे,बाळासाहेब
भड,प्रदिप गाडे,अरुण मिटके विनोद घोडके आदिनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने