होमिओपॅथिक समितीतर्फे मंत्र्यांचा निषेध

येवला - बॉम्बे होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर अँक्ट 1959 मधील 'ओन्ली' हा शब्द काढण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर होण्यापूर्वीच त्यास
तीन मंत्र्यांनी अनौपचारिक चर्चेप्रसंगी विरोध दर्शविला. राज्य होमिओपॅथिक डॉक्टर्स कृती समितीने सोमवारी प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांना निवेदन सादर करून त्या तीन मंत्र्यांच्या भूमिकेचा निषेध नोंदविला.राज्यातील 60 हजार होमिओपॅथिक डॉक्टरांना अँलोपॅथीची परवानगी देण्यासंदर्भातील प्रस्तावाला राज्यमंत्री मंडळातील डॉ. विजयकुमार गावित, राजेंद्र दर्डा, सुरेश शेट्टी यांनी विरोध दर्शविला आहे. परिणामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय मांडण्यात आला नाही. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर 19 डिसेंबर रोजी होमिओपॅथी डॉक्टरांनी 'अर्धनग्न मोर्चा' काढला होता. या वेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सदरचा प्रस्ताव सादर करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात कार्यवाही करण्यास अडचणीनिर्माण केल्या जात असल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.
थोडे नवीन जरा जुने