अनकाईजवळ सापडला अनोळखी तरुणाचा मृतदेह...जवळ गोळीची केस सापडल्याने खुनाचा संशय

येवला - तालुक्यातील नगर मनमाड महामार्गावरील अनकाई किल्याजवळील राजस्थान
धाब्याजवळ रस्त्याच्या कडेला एका २५ते ३० वयोगटातील तरुणाचा मृतदेह
आढळून आला. सदरच्या तरुणाच्या कानाखालील बाजूने जखम असून शेजारीच गोळीची
पुंगळी सापडल्याने सदर च्या तरुणाचा मुत्यु गोळीबाराने झाला असल्याची
शक्यता असल्याचे समजते. या तरुणाच्या शर्टावर केस्टाईल टेलर्स मोतीनगर
धुळे असे लेबल असून याबाबत अधिक तपासासाठी धुळे मालेगाव येथे पोलिस
तपासपथके रवाना झाल्याचे समजते. सदर तरुणाच्या अंगात निळ्या धारेचा शर्ट,
जीन्स पँट, चेहरा उभट, निमगोरा उंची ५.५ फुट आहे. संध्याकाळपर्यंत याबाबत
तालुका पोलिस
ठाण्यात गुन्ह्याची नोंद झालेली नसून घटनास्थळी मनमाड विभागीय पो.अधिक्षक
समाधान पवार तसेच मालेगांव चे अप्पर पो.अधिक्षक सुनिल कडासने यांनी भेट
दिली . अधिक तपास पो.नि.सुरेंद्र शिरसाठ करीत आहे.
थोडे नवीन जरा जुने