येवला शहर पोलिस ठाण्यातील पोलिस लाचलुचपतच्या सापळ्यात.........?

येवला - येवला शहर पोलिस ठाणे मध्ये कार्यर्त असलेले पोलिस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत विभागाच्या धुळे येथील अधिकाऱ्यांनी आपल्या सापळ्यात अलगद पकडले. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही चालू होती. किशोर परदेशी यांचा वाळूचा ट्रक येवला पोलिसांनी दि.२३ रोजी पकडला होता . याचा तपास पो उ नि सोमनाथ कर्णवार यांच्याकडे होता. सदरचा ट्रक येवला पोलिस ठाण्याजवळ उभा केलेला होता . फिर्यादी परदेशी यांच्या मुलांवर गुन्हा दाखल करु नये व ट्रक तहसिलकडे देऊ नये म्हणून ५०००० रुपये मागीतले होते. परंतू ३०००० रु वर तडजोड झाली असे समजते. याबाबत किशारे परदेशी यांनी धुळे लाचलुचपत विभागाकडे संपर्क साधला व तक्रार दाखल केली. त्यानुसार सापळा रचून आज तृषार खालकर या पो.कॉ ला ३०००० रुपये स्विकारत असताना त्यांनी पकडले. याबाबत अजुन तीन कर्मचारी गुंतलेले असल्याचे समजते. एक पो.उ.नि व एक सहा पो उ नि आणि एक पो.हवालदार यांच्या सहभागाबाबत चौकशी रात्री उशीरापर्यंत सुरु होती. याबाबत अधिक चौकशीसाठी नाशिक येथील लाचलुचपतचे पो.उपअधिक्षक शालीग्राम पाटील व श्याम शिंदे येवल्यात दाखल झालेले आहेत. या बाबत अधिक खुलासा चौकशी पुर्ण झालेवर च देता येईल असे धुळे लाचलुचपत पो.नि विजय चौरे यांनी सांगीतले. दरम्यान शहर पोलिस ठाण्याबाबत अनेक वावड्या जनतेत उठलेल्या असून दुपारी २ च्या दरम्यान झालेल्या घटनेबाबत रात्री उशीरापर्यंत दाखल न झालेल्या गुन्हा्याबाबत उलट सुलट चर्चा जनतेत चालु झाल्या आहेत.
थोडे नवीन जरा जुने