येवला शहरातल्या पैठणीच्या व्यापाऱ्यावर महिला व्यावसायिकेची धमकी देऊन फसवणूक करण्याचा आरोप.... गुन्हा दाखल

येवला - औरंगाबाद शहरातील महिला व्यावसायिकेस केस करण्याची धमकी देऊन तीन लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या व बनावट बिल तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी येवला येथील दोन आरोपींविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात खंडणी व फसवणुकीचा गुन्हा रविवारी दाखल करण्यात आला आहे. उल्कानगरी येथील पैठणी आर्ट गॅलरीच्या संगीता राजेंद्र धकाते यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार , येवला येथील बाळकृष्ण नामदेव कापसे व सचिन सुरासे या व्यापा-यांसोबत पाच वर्षापुर्वी यांचा व्यावसायिक व्यवहार होता.

हा व्यवहार धकाते यांनी पुर्ण केला होता मात्र त्यांचे काही चेक दोन्ही व्यापा-यांनी परत केले नव्हते. मार्च २०१३ रोजी धकाते यांच्याकडे या दोघांची काहीही रक्कम बाकी नसताना त्यांनी संगीता धकाते , त्यांचे पती व सासऱ्यांच्या नावाने नोटीस पाठवून केस करणार असल्याची धमकी दिली.

तसेच , धकाते यांचे बाउन्स झालेले व इतर चेक परत करण्यासाठी तीन लाख रुपये घेतले. यापैकी एक लाख रुपये आरोपींनी चेकद्वारे घेतले. तसेच , या दोन लाखांच्या रक्कमेपोटी त्यांनी धकाते यांच्या दुकानाच्या नावाने खोटे बिल तयार करीत त्यावर संगीता धकाते यांची बनावट सही केली. हा प्रकार निदर्शनास आल्यामुळे संगीता धकाते यांनी रविवारी जवाहरनगर पोलिस ठाणे गाठून दोन्ही आरोपींविरुद्ध खंडणी व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पीएसआय तावरे तपास करीत आहेत.
थोडे नवीन जरा जुने